युवकांच्या हदयातील नेता आम्ही गमावला; पृथ्वीराज चव्हाण भावुक

त्यांची प्रकृती ठीक झाल्याचे आम्हांला समजले हाेते. परंतु वेगळेच झाले. दिल्लीमधील नेतृत्वास तर फार माेठा धक्का बसला आहे.
rajiv satav
rajiv satavesakal
Updated on

सातारा : काँग्रेसचे खासदार राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) यांचं आज (रविवार) पुण्यात निधन झालं. सातव यांना राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) , खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी शाेक व्यक्त केला आहे. congress mp rajiv satav passes away prithviraj chavan udayanraje bhosale political fraternity mourns his death

ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले काेविडच्या महामारीमुळे काॅंग्रेसमधील राष्ट्रीय पातळीवरील आम्ही दूसरा नेता गमावला आहे. यापुर्वी अहमद पटेल यांना गमावले. आता एेन तारुण्यातील खासदार राजीव सातव हे काेविडचे बळी ठरले. आमच्या संघटनेतील काेविडचा हा दूसरा बळी ठरला आहे.

rajiv satav
राजीव सातव, तू हे काय केलेस...; संजय राऊतांची भावनिक पोस्ट

अत्यंत कमी वयात राजीव सातव यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते खासदार हाेण्यापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. सध्या ते राज्यसभेचे सदस्य हाेते. त्यांना अखिल भारतीय युवक काॅंग्रेसचे संधी मिळाली. प्रत्येक संधीचे त्यांनी साेने केले. स्वभाविकपणे देशातील तरुण नेता, हाेतकरु नेता म्हणून त्यांची ख्याती झाली.

काॅंग्रेसचे सरचिटणीस म्हणून अनेक राज्यांची जबाबदारी त्यांनी पेलली हाेती. पेलत हाेती. युवक काॅंग्रेसच्या कारिकर्दीत त्यांच्याकडे युवा नेत्यांचा माेठा परिवार उभा केला. त्यातून ते काॅंग्रेसची ताकद उभी करीत हाेते. काॅंग्रेस नेतृत्वावर त्यांचावर प्रचंड माेठा विश्वास हाेता. त्यांना खूप चांगले भवितव्य हाेते. राहूल गांधी यांनी काॅंग्रेसची पुर्नरचना करताना युवक काॅंग्रेसमध्ये कामगिरी बजावलेल्यांना संधी दिली. त्यामधील खासदार राजीव सातव हे आहेत.

दिल्लीला खासदार म्हणून गेल्यानंतर त्यांचे राज्यातील राजकारणावर थाेडेसे अलिप्त राहिले. परंतु महाराष्ट्रातील राजकारणावर त्यांची बारीक नजर असायची. अनेक नेते त्यांना दिल्लीला जाऊन महाराष्ट्राच्या प्रश्नांबाबत माहिती देत असतं. सातव यांचे संसदेमधील कार्य उत्तम हाेते. खरंतर त्यांनी संघटनेच्या कामासाठी वाहून घेतले हाेते. त्यामुळे महाराष्ट्राचे तसेच अखिल भारतीय काॅंग्रेसचे फार माेठे नुकसान झालेले आहे. त्यांना देखील खूप चांगले भवितव्य हाेते. त्यांची प्रकृती ठीक झाल्याचे आम्हांला समजले हाेते. परंतु वेगळेच झाले. दिल्लीमधील नेतृत्वास तर फार माेठा धक्का बसला आहे असेही चव्हाण यांनी नमूद केले.

rajiv satav
खासदार राजीव सातव यांच्या निधनाने हिंगोली लोकसभा मतदार संघावर शोककळा

खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनीही शाेक व्यक्त करताना सातव यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटलं आहे. उदयनराजेंनी tweet करुन आपली भावना व्यक्त केली आहे. ते लिहितात काँग्रेसचे युवा नेते खासदार राजीव सातव यांचे आज दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आमचे राज्यसभेतील सहकारी राजीवजी आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

rajiv satav
खासदार राजीव सातव यांना अशोक चव्हाण आणि खासदार चिखलीकर यांची श्रद्धांजली
rajiv satav
हिंगोली ते दिल्ली, जाणून घ्या राजीव सातव यांचा राजकीय प्रवास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()