Ashok Chavan Join BJP : नांदेड कोणा एका व्यक्तीचा बालेकिल्ला नाही; नाना पटोलेंचं अशोक चव्हाणांना थेट आव्हान

Nana Patole on Ashok Chavan Join BJP : माजी खासदार मिंलींद देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे.
Congress Nana Patole On Ashok Chavan Join BJP Nanded Politics amide lok sabah election 2024 politics rak94
Congress Nana Patole On Ashok Chavan Join BJP Nanded Politics amide lok sabah election 2024 politics rak94
Updated on

Nana Patole on Ashok Chavan Join BJP : माजी खासदार मिंलींद देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला अगदी काही दिवसांच्या फरकाने दोन मोठे धक्के बसले आहेत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यानंतर नांदेड आता कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाणांना थेट आव्हान दिल्याचे पाहायला मिळालं.

काँग्रेसचे अजून आमदारा फुटणार का?

अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशानंतर काँग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी काँग्रेसचे आमदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांवर विचारले असता नाना पटोले म्हणाले की, १५ तारखेला सीएलपीची बैठक आहे. १५ तारखेला साडे नऊ वाजता आम्ही सगळे आमदार सोबत राहाणार आहोत. १६ आणि १७ तारखेला लोणावळा येथे आमचं शिबीर होणार आहे. या शिबीरात देखील आमचे सगळे आमदार उपस्थित राहतील, त्यामुळे अशा सर्व अफवांना पुर्णविराम दिला जावा असे आमचे म्हणणे आहे असे नाना पटोले म्हणाले.

Congress Nana Patole On Ashok Chavan Join BJP Nanded Politics amide lok sabah election 2024 politics rak94
Ashok Chavan Joins BJP : आदर्श घोटाळ्याचं काय झालं? भाजपत प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण स्पष्टच बोलले

काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील विजय निश्चित करण्यासाठी अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेतलं, तसेच नांदेड आता कोणाचाही बालेकिल्ला राहिलेला नाही यासंबंधीच्या राजकीय चर्चेविषयी विचारले असता नाना पटोले म्हणाले की, नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. कोणत्याही व्यक्तीविशेषचा नाही. त्यामुळे काँग्रेसचाचा खासदार तिथे निवडून येईल. आता नांदेडची लोकं इथं आले असून त्यांनी हमी खेतली, आम्हाला फक्त चांगला उमेदवार द्या... आमच्याकडे उमेदवार देखील आहे. आमच्याकडे उमेदवारांची कमतरता नाही. भाजपचे अनेक आमदार-खासदार आमच्या संपर्कात आहेत असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.

Congress Nana Patole On Ashok Chavan Join BJP Nanded Politics amide lok sabah election 2024 politics rak94
Balasaheb Thorat: अशोक चव्हाण गेले आता बाळासाहेब थोरातांकडे महत्त्वाची जबाबदारी; मल्लिकार्जुन खरगेंचा आला फोन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.