Congress Nana patole slam  cm eknath shinde govt over up cm yogi adityanath mumbai visit
Congress Nana patole slam cm eknath shinde govt over up cm yogi adityanath mumbai visit

आता यूपी पळवणार महाराष्ट्रातले उद्योग? CM योगींच्या मुंबई दौऱ्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

Published on

Yogi Adityanath in Mumbai : फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लखनऊ येथे होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट (GIS) साठी देशातील बड्या उद्योगपतींना आमंत्रित करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबईत दाखल झाले आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते निवडक उद्योगपती आणि चित्रपट क्षेत्रातील लोकांची भेट घेणार आहेत. दरम्यान या दौऱ्यावर कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे.

नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून दिल्लीच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचे महत्व कमी केले जात असल्याचा आरोप केला आहे. शिंदे फडणवीस सरकारने वेदांता-फॉक्सकॉन हा १.५४ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पासह इतर महत्वाचे प्रकल्प गुजरातला भेट देऊन महाराष्ट्राचे मोठे आर्थिक नुकसान केले, लाखो तरुणांचे रोजगारही गेल्याचे पटोले म्हणाले आहेत.

हेही वाचा - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

"उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढावी यासाठी ४ व ५ जानेवारीला योगी आदित्यनाथ हे मुंबईत येत असून उद्योगपती, चित्रपटसृष्टीतील महत्वाच्या लोकांशी ते चर्चा करणार आहेत."

"आता उरलेले उद्योग उत्तर प्रदेशच्या घशात घालण्यासाठी खोके सरकारने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी पायघड्या घातल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचा हा कुटील हेतू जनतेने लक्षात घ्यावा." असेही पटोले म्हणाले आहेत .

Congress Nana patole slam  cm eknath shinde govt over up cm yogi adityanath mumbai visit
Delhi Girl Accident : ती गाडीखाली अडकल्याचं त्यांना माहिती होतं, तरीही…; मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
Congress Nana patole slam  cm eknath shinde govt over up cm yogi adityanath mumbai visit
OnePlus 11 स्मार्टफोन लॉन्च! मिळतो दमदार प्रोसेसर अन् कॅमेरा, जाणून घ्या किंमत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

तसेच सायंकाळी आदित्यनाथ हे कुलाबा येथील हॉटेल ताजमहाल येथे ते मुंबईत राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील उद्योजकांना भेटतील. तसेच ते सिनेविश्वातील काही मान्यवरांना भेटणार आहे. ज्यांना ते उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे बांधण्यात येत असलेल्या फिल्म सिटीच्या प्रगतीची माहिती देतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()