Congress Rap Song: 'पलटी करणार सरकार, सोपा वाटलो काय?' काँग्रेस इलेक्शन मोडवर! महायुती सरकार विरोधात आणलं 'रॅप साँग'

काँग्रेस महायुती सरकारच्या कारभाराविरोधात 'पाप पत्र' नावाचं पत्रकही जाहीर केलं आहे.
Varsha Gaikwad_Congress
Varsha Gaikwad_Congress
Updated on

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आता अधिकृतरित्या इलेक्शन मोडवर गेला आहे. याची घोषणाच खासदार वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यानुसार काँग्रेस आज महायुती सरकारविरोधात 'पाप पत्र' जाहीर केलं असून एक सरकारच्या कारभाराविरोधात रॅप साँगही रिलीज केलं आहे.

Varsha Gaikwad_Congress
Vidhan Sabha Election: "जोपर्यंत अजित पवार..."; प्रकाश आंबेडकर यांची तिसऱ्या आघाडीबाबत महत्वाची टिप्पणी

महाराष्ट्रात घडत असलेल्या विविध घडामोडींचा या रॅप साँगमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नव्यानं स्थापन केलेल्या सरकारचा उल्लेख करण्यात आला आहे. सरकारनं जाहीर केलेल्या विविध योजना, पेपर फुटी-परीक्षांमधील घोटाळे, पोलीस भरतीतील गोंधळ, कोयता गँगच्या दहशती, घडलेले विविध गुन्हे, मराठी शाळा बंदचा निर्णय, मुलींचे हॉस्टेल बंद, डीएड-बीएड कॉलेज बंद यांसारख्या मुद्द्यांचा या रॅप साँगमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Varsha Gaikwad_Congress
Success Story: शिक्षणाची जिद्द असलेली ठाण्याची नूरजहाँ बनली एकलव्य! संर्घष वाचून तुम्हाला वाटेल अभिमान

दरम्यान, आम्ही आता इलेक्शन मोडवर जात आहोत, असं मी जाहीर करते अशी घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली. यानंतर काँग्रेसच्यावतीनं महायुती सरकारच्या कारभाराविरोधात 'पाप पत्र' नावाचं पत्रक जाहीर केलं. सरकारी घोषणा आणि त्यातील फोलपणाचा या पत्रात समावेश आहे.

Varsha Gaikwad_Congress
Shraddha Kapoor : अखेर लग्नाच्या प्रश्नावर श्रद्धा कपूरचं उत्तर, म्हणते "जेव्हा नवरी बनायचंय..."

महायुतीचे सरकार आल्यापासून मुंबईचा मान खालावत चालला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मुंबईची अधोगती झाली आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. वरळीमधील 'हिट आणि रन' ही घटना घडली. मुंबईमधील सर्व महत्त्वाचे प्रकल्प गुजरातमध्ये नेले गेले. मुंबईतील रस्त्यांवर प्रचंड खड्डे झाले आहेत. ही खड्डे बुजवण्याची कामं मित्रांना दिली जात आहेत. अधिकाऱ्यांचं आणि आमदारांचं एक रेट कार्ड असल्याचा गंभीर आरोपही या पत्रातून काँग्रेसनं केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.