Congress: काँग्रेसचा पक्ष स्थापना दिन होणार 'या' ठिकाणी साजरा! सोनिया आणि राहुल गांधींबरोबरच 'हे' नेते लावणार हजेरी

काँग्रेसने पक्षाचा स्थापना दिन नागपूरमध्ये साजरा करण्यासाठी जागेचा शोध घेतला जात असून दिघोरी जवळील पटांगणावर सभा घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
Congress
Congressesakal
Updated on

Congress Sabha in Dighori: काँग्रेसने पक्षाचा स्थापना दिन नागपूरमध्ये साजरा करण्यासाठी जागेचा शोध घेतला जात असून दिघोरी जवळील पटांगणावर सभा घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी येणार असून यात देशभरातील सुमारे १० लाख कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे.

एवढ्या मोठ्‍या प्रमाणात गर्दी होणार असल्याने जागेसाठी गेल्या काही दिवसांपासून शोधाशोध सुरू होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दाभा, कळमना आणि दिघोरी येथे जागांची पाहणी केली होती. यापैकी दिघोरीचे स्थळ निश्चित झाले असल्याचे समजते. (Latest Marathi News)

याच मोकळ्या जागेत महिन्याभरापूर्वी पं. शर्मा यांच्या शिवकथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या कार्यक्रमाला दररोज पाच ते सहा लाख भाविकांची गर्दी रहात होती.

Congress
Youtuber Kamiya Jani: यूट्यूबर काम्या जानीच्या जगन्नाथ मंदिरात जाण्याने इतका गोंधळ का? भाजपने केलीय अटकेची मागणी!

नागपूरची सभा आणि महारॅली काँग्रेससाठी महत्त्वाची राहणार आहे. यातूनच आगामी लोकसभा निवडणुकीचे रणगिंश संघभूमीतून फुंकले जाणार आहे. यानिमित्त २८ डिसेंबरला महारॅली काढण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, माजी केंद्रीय मंत्री खा. मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे नियोजन केले जात आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महारॅलीत राज्यभरातून १० लाख लोक सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे.

Congress
Corona Update: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनं अॅलर्ट मोडवर; आरोग्य मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()