Congress
Congress

Congress MLA: काँग्रेसचा कठोर निर्णय! विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या 7 आमदारांची शिक्षा ठरली?

Congress Punishment for 7 MLAs: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी क्रॉस वोटिंग झाल्यानंतर फुटीर आमदारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अशा आमदारांनी नावे दिल्ली हायकमांडकडे पाठवणार असल्याचं ते म्हणाले होते.
Published on

मुंबई- विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटली होती. याप्रकरणी फुटलेल्या आमदारांवर काँग्रेस पक्षाकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले जाणार आहे. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची माहिती आहे. या सात आमदारांवर कठोर कारवाईची तयारी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी क्रॉस वोटिंग झाल्यानंतर फुटीर आमदारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अशा आमदारांनी नावे दिल्ली हायकमांडकडे पाठवणार असल्याचं ते म्हणाले होते.

Congress
Congress MLA: विधान परिषदेत फुटलेल्या काँग्रेसच्या आमदारांची नावे समोर! हायकमांड आता काय निर्णय घेणार?

काँग्रेसच्या आमदारांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मत दिल्याचं सांगितलं जातं. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या विधान परिषदेच्या रिंगणात होत्या. काँग्रेसकडे गरजेपेक्षा जास्त मते होती. त्यामुळे उर्वरित मते ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना देणे अपेक्षित होते. पण, काँग्रेस आमदारांनी क्रॉस वोटिंग केली. त्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव झाला.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार होती. यात, महायुतीने ९ उमेदवार उभे केले होते, तर महाविकास आघाडीने ३ उमेदवार उभे केले होते. एकूण १२ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक बिनविरोध होऊ शकली. निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचं पाहायला मिळालं. तिसऱ्या उमेदवारासाठी पुरेशी मतं नसताना महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार का उभा केला असा प्रश्न विचारला जात आहे.

Congress
Jalgaon Congress News : काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली! प्रदेश उपाध्यक्षांच्या सत्कारास जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना डावलले

ठाकरे आणि शरदचंद्र पवार गटाला अजित पवार गटाची किंवा शिंदे गटाची मतं फुटेल असं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त उमेदवार उभा केला होता. पण, शिंदे किंवा अजित पवार गटाची मतं फुटली नाहीत. उलट, अजित पवार गटाला चार अधिकची मतं पडली. अजित पवार गटाने दोन, शिंदे गटाने दोन, भाजपने पाच तर ठाकरे गट, काँग्रेसने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com