MIM Vs Congress: "काँग्रेसपेक्षा एमआयएम पक्ष मोठा"; जलिल यांच्या दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया, म्हणाले, दहा वर्षांपासून...

भाजपला हारवण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावं की नाही? यावरही एमआयएमनं भाष्य केलं.
Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleelsakal
Updated on

मुंबई : काँग्रेसपेक्षा एमआयएम हा पक्ष महाराष्ट्रात मोठा आहे, असा दावा खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता. यावर आता काँग्रेसनं प्रतिक्रिया दिली असून जलील यांना हे विधान शोभणारं नाही, असं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तर एमआयएम ही सातत्यानं जातीयवाद पसरवणारी संघटना असून भाजपला मदत करणारा पक्ष असल्याचं म्हटलं आहे. (Congress reaction on MP Imtiyaz Jalil comment MIM is big party than congress)

Imtiaz Jaleel
Sam Pitroda on Ram Temple: काँग्रेस नेते सॅम पित्रोदांचं पुन्हा राम मंदिराबाबत भाष्य; म्हणाले, महागाई, बेरोजगारीचं...

काय म्हणाले होते जलील?

खासदार जलील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, काँग्रेसपेक्षा माझा पक्ष मोठा आहे महाराष्ट्रात मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो कारण काँग्रेसचा एकही खासदार लोकसभेत नाही आमचा तरी एक खासदार आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहेत. त्यामुळं त्यांनी माझ्याकडं यायला पाहिजे की आमच्यासोबत येता का? भाजपला जर तुम्हाला हारवायचंच असेल तर सर्वांना सोबत घेऊन चाललं तर बरंच होईल. (Latest Marathi News)

Imtiaz Jaleel
Lee Sun-kyun Death: ऑस्कर विजेत्या 'पॅरासाईट' सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याचं दुःखद निधन

काँग्रेस १०० वर्षे जुनी

एमआयएमनं असं वक्तव्य करणं त्यांना न शोभणारी बाब आहे. काँग्रेसची शंभर वर्षांपेक्षा जास्त असलेली पार्श्वभूमी, देशात असलेली पाळंमुळं आणि देशात असलेलं काँग्रेसचं काम. तसेच नुकतेच दहा वर्षांपासून एमआयएमचं अस्तित्व दिसतं आहे, त्यामुळं त्यांची काँग्रेसशी तुलना होऊ शकत नाही. (Marathi Tajya Batmya)

Imtiaz Jaleel
'8 एप्रिल 1627 हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी'; ज्येष्ठ इतिहास संशोधकाचं स्पष्ट मत

एमआयएम जातीयवादी संघटना -शिवसेना

तर दुसरीकडं शिवसेनेच्या ठाकरे गटानं यावरुन एमआयएमवर टीकास्र सोडलं आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले, एमआयएमचं कुठली वैचारिक बैठक आहे. एमआयएम तर सातत्यानं जातीयवाद पसरवणारी संघटना आहे. भाजपला मदत करणारी संघटना आहे. भाजपला मदत करणारी संघटना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.