बुध्दीमत्ता, लैंगिकतेचा संबंध नसतो हे संघींना समजणार नाही : सावंत

Sudhir Mungantiwar Sachin Sawant
Sudhir Mungantiwar Sachin Sawante sakal
Updated on

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (BJP Leader Sudhir Mungantiwar) यांनी विद्यापीठाच्या सुधारणा विधेयकावर चर्चा करताना LGBTQ समाजाबद्दल वादग्रस्त (Mungantiwar Statement Against LGBTQ Community) वक्तव्य केले होते. ''तुम्ही समलैंगिक लोकांना सदस्य म्हणून नियुक्त करणार आहात का? काही तर गांभीर्य ठेवा. अलैंगिक व्यक्ती म्हणजे जनावरासोबत संबंध ठेवणारी व्यक्त का?'' असं मुनगंटीवार म्हणाले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Leader Sachin Sawant) यांनी मुनगंटीवारांवर जोरदार टीका केली आहे.

Sudhir Mungantiwar Sachin Sawant
LGBTQ समाजाबद्दल मुनगंटीवार नेमकं काय बोलले? जाणून घ्या

''बुध्दीमत्ता व लैंगिकता यांचा संबंध नाही हे देशाला बुरसटलेल्या विचारांच्या अंध:कारात घेऊन जाऊ पाहणाऱ्या संघाच्या लोकांना समजणार नाही. कारण स्वतंत्र बुद्धी ही संघ विचारधारेसाठी घातक आहे'', अशी जोरदार टीका सचिन सावंत यांनी मुनगंटीवारांवर केली आहे. तसेच त्यांच्या माहितीसाठी समलैंगिक लोकांची यादी देखील सावंतानी शेअर केली आहे. ''जगात प्रचंड सकारात्मक व प्रगतीशील बदल घडवणारे अनेक वैज्ञानिक, विचारवंत, चित्रकार हे समलैंगिक होते. फ्लॉरेन्स नाईटिंगेल, लिओनार्दो दि विंची, संगणकाचा पाया घातला ते अॅलन ट्युरिंग, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिमचा निर्माता जॉन हॉल आदी अनेकजण समलैंगिक होते. मुनगंटीवार यांच्या माहितीसाठी यादी देत आहे. यापैकी कोणीही सदस्यच काय तर कुलगुरू म्हणून काम केले असते तर भारतीय विद्यापीठे जगात प्रथम क्रमांकावर असती'', असं सचिन सावंत म्हणाले.

काय म्हणाले होते मुनगंटीवार? -

''काही गोष्टी सिद्ध करता येत नाहीत. या बिलानुसार सद्स्य कोणाकोणाला करता येईल? हे तुम्ही सांगितलं. समलिंगी संबंध असणारी स्त्री, समलिंगी संबंध असणारा पुरुष, उभयलिंगी संबंध असणारा व्यक्ती, तृतीयपंथी, समलिंगी संभोगाचे आकर्षण असणारा पुरुष, आंतरलैंगिक, अलैंगिक पुरुष यांना सदस्य करता येणार आहे. पण, अध्यक्ष महोदय हे सिद्ध कोण करणार आहे. तुम्ही करणार आहात का? व्हॉईस चान्सलर त्यांना सर्टीफिकेट देणार आहे? की या व्यक्तीला समलैंगिक संबंधाचे आकर्षण आहे. कोणीतरी लिहून देईल का की मला समलैंगिक संबंध ठेवण्याबाबत आकर्षण आहे. कोण सिद्ध करणार आहे?'' असे अनेक सवाल मुनगंटीवारांनी उपस्थित केले.

''समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य म्हणून नियुक्त करणार आहात का? काहीतर गांभीर्य ठेवा. यामध्ये उभयलिंगी आणि अलैंगिक संबंधाचा उल्लेख केला आहे. पण, त्याची परिभाषा अजून कोणी सांगितली नाही. अलैंगिक संबंध म्हणजे जनावरासोबत ठेवलेले संबंध. ते जनावर तुम्हाला तुम्ही अलैंगिक असण्याचं प्रमाणपत्र देणार आहे का?'' असं वादग्रस्त वक्तव्य देखील मुनगंटीवारांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.