Graduate Constituency Election : 'मामा'लाच मामा बनवलं! बाळासाहेब थोरात विरुध्द तांबे संघर्ष पेटणार?

congress  satyajeet tambe balasaheb thorat clash over graduates constituency election Maharashtra politics
congress satyajeet tambe balasaheb thorat clash over graduates constituency election Maharashtra politics
Updated on

मविआकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेसकडून डॉ.सुधीर तांबे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली मात्र, ऐनवेळी सुधीर तांबेंनी आपली उमेदवारी मागे घेत त्यांच्या मुलगा सत्यजीत तांबे यांचा अर्ज दाखल केला.दरम्यान आता ही निवडणूक बिनविरोध होणार का याबद्दल चर्चा सुरू आहे.

कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सत्यजीत तांबे यांचे मामा आहेत,दरम्यान आजचे राजकीय नाट्य पाहाता राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती सत्यजीत तांबे यांनी फडणवीसांची साथ देत मामाला 'मामा' बनवलं याची. कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि कॉग्रेस पक्ष यांना तांबे पीता-पुत्रांकडून अंधारात ठेवलं असल्याचे बोलले जात आहे.

यामुळे आता थोरात विरोधात तांबे असा संघर्ष अहमदनगरच्या राजकारणात सुरू झाल्याची चर्चा देखील आहे. कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर करून देखील फॉर्म न भरल्याने सुधीर तांबे यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार का हे देखील उत्सुकतेचा विषय आहे.

हेही वाचा - गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

सत्यजीत तांबे यांना काही महिन्यांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी भाजपत येण्याची खुली ऑफर दिली होती. त्यावरुनच पदवीधर मतदार संघात भाजपकडून सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. त्यानंतर कॉंग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर सुधीर तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.

दरम्यान आज सत्यजीत तांबे यांना भाजपने ए.बी. फॉर्म दिला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यासंबंधी तांबेंना प्रश्न विचारला असता त्यांनी नकार दिला. तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला काँग्रेस पक्षाचा ए.बी. फॉर्म मिळाला नसल्याचं तांबेंनी सांगितलं.

congress  satyajeet tambe balasaheb thorat clash over graduates constituency election Maharashtra politics
Satyajeet Tambe : सत्यजीत तांबे नेमके कुणाचे उमेदवार? भाजपकडेही मागणार मदत

भाजपमध्ये प्रवेशाबद्दल तांबे काय म्हणाले?

शिंदे गट किंवा भाजपत सामील होणार का? असा प्रश्न सत्यजीत तांबे यांना काही दिवसांपूर्वी विचारण्यात आला होता, त्यावरही त्यांनी सूचक विधान केले होते. ते म्हणाले होते की, मी भाजप किंवा शिंदे गटात जाणार नाही. मात्र, त्यांना जर मला मदत करायची असेल तर ते करु शकतात. मला ईकडे (म्हणजे काँग्रेस मध्ये) राहुनही ते संधी देऊ शकतील. 'ईडी'ने मदत करावी, अशी अपेक्षा आहे. म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मदत करावी, असे तांबे म्हणाले होते.

congress  satyajeet tambe balasaheb thorat clash over graduates constituency election Maharashtra politics
Graduate Constituency Election: सत्यजीत तांबेंची खेळी; भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

काँग्रेसबद्दल तांबे काय म्हणाले...

काँग्रेसबद्दल बोलताना सत्यजीत तांबे यांनी आज सांगितले की, मी काँग्रेसचाच उमेदवार आहे. तरीही भाजपची मदत मिळावी म्हणून मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती करणार आहे. आपली राजकीय परंपरा प्रगल्भ आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या जागा आपल्याकडे बिनविरोध होतात. त्यामुळे भाजपची मदत मिळेल.

दरम्यान, काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देऊनही त्यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असं सांगितलं जात आहे. दुसरीकडे विखे पाटलांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देऊ, असं मत व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.