राज्यपाल या संस्थेचा असंविधानिक दुरुपयोग, काँग्रेसकडून कारवाईची मागणी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या 'त्या' व्हायरल पत्रावरुन वाद
Bhagat Singh Koshyari And Atul Londhe
Bhagat Singh Koshyari And Atul Londheesakal
Updated on

मुंबई : भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारच्या बहुमत चाचणीचं पत्र दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३० जून रोजी विशेष अधिवेशन बोलवले असल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावर राजभवन सचिवांकडून स्पष्टीकरण दिले गेले. सदरील पत्र खोट असल्याचे राजभवनाकडून सांगण्यात आले. या व्हायरल पत्रावरुन काँग्रेस पक्ष (Congress Party) आक्रमक झाल्याचे दिसत आहे. (Congress Spoke Person Atul Londhe Demand Action Against Who Did Viral Fake Letter Of Governor)

Bhagat Singh Koshyari And Atul Londhe
फडणवीसांच्या पत्रानंतर राजकीय हालचालींना वेग, बच्चू कडू येणार उद्या मुंबईत

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी ट्विट करुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. लोंढे म्हणतात, राज्यपाल या संस्थेचा असंविधानिक दुरुपयोग झालेला दिसतो. हे पत्र ज्याने कोणी काढलेलं असेल त्यांनी तो गुन्हा केलेला आहे. (Maharashtra Politics)

Bhagat Singh Koshyari And Atul Londhe
पवार X फडणवीस : महाराष्ट्रातल्या राजकारणातील चाणक्य ठरवणारी ‘लढाई’

त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी सन्माननीय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असल्याचे लोंढे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()