Shiv Sena : काल काँग्रेसमध्ये इफ्तार पार्टी अन् आज शिवसेना प्रवेश! कोण आहेत राजू वाघमारे?

''सांगलीची जागा काँग्रेसची आहे. परंतु उद्धव ठाकरेंनी ती जागा जाहीर केली. आता काँग्रेस नेत्यांना दिल्लीवाऱ्या कराव्या लागत आहेत. भिवंडीची जागा पारंपारिक काँग्रेसची होती तरीही शरद पवार गटाने त्यांच्या उमेदवाराची घोषणा केली.''
raju waghmare
raju waghmareesakal
Updated on

मुंबईः काँग्रेसचे प्रवक्ते आणि पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणारे राजू वाघमारे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला.

यावेळी बोलताना राजू वाघमारे म्हणाले की, काँँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची एका प्रादेशिक पक्षाने केलेली ससेहोलपट बघता कार्यकर्ते व्यथित आहेत. पक्षातल्या काही स्वार्थी आणि गलिच्छ राजकारणाने मी त्रस्त होतो त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

वाघमारे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील काही ठाराविक नेत्यांच्या हाताखाली काँग्रेस दबलेली आहे.. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस काम करतेय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई उत्तर पश्चिमची जागा संजय निरुपम यांनी मागितली होती. परंतु त्यांना डावललं त्यामुळे त्यांना पक्षातून बाहेर पडावं लागलं.

raju waghmare
RBI Action: रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई; 'या' बँकेतील ग्राहकांना खात्यातून पैसे काढता येणार नाहीत

''सांगलीची जागा काँग्रेसची आहे. परंतु उद्धव ठाकरेंनी ती जागा जाहीर केली. आता काँग्रेस नेत्यांना दिल्लीवाऱ्या कराव्या लागत आहेत. भिवंडीची जागा पारंपारिक काँग्रेसची होती तरीही शरद पवार गटाने त्यांच्या उमेदवाराची घोषणा केली.''

''त्यामुळे काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. कुणाचा कुणाचा पत्ता नाही. म्हणूनच आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मी शिवसेनेत प्रवेश केला आहे.'' असं राजू वाघमारे म्हणाले.

raju waghmare
Kalyan Loksabha: श्रीकांत शिंदेंसाठी कल्याणची आव्हानं संपेनात; गणपत गायकवाडांच्या पत्नीनं घेतली ठाकरेंच्या उमेदवाराची भेट

''एकनाथ शिंदेंचं काम ऐतिहासिक''

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री कोण असेल, तर ते एकनाथ शिंदे आहेत. दोन वर्षांत त्यांनी केलेलं काम भारताच्या इतिहासात कुणीही केलेलं नाही, विरोधकांनाही हे मान्य करावं लागेल, एक कार्यकर्त्याची भावना जपणारा आणि त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारा नेता, अशी त्यांची इमेज आहे. अशा शब्दांमध्ये राजू वाघमारे यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.

Related Stories

No stories found.