मुंबई : काँग्रेसच्या 'एक व्यक्ती एक पद' अभियानाला महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. नसिम खान यांच्यापासून याला सुरुवात झाली असून खान यांनी मुंबई काँग्रेस प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आला आहे. नसिम खान यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचं कार्याध्यक्षपद देखील आहे. (Congress started One Person One Position campaign in Maharashtra Nasim Khan resigns)
राजस्थानातील उदयपूर इथं काँग्रेसचं नुकतंच चिंतन शिबीर पार पडलं. यावेळी 'एक व्यक्ती, एक पद' अर्थात पक्षामध्ये एका व्यक्तीला एकच पद देण्याची घोषणा करण्यात आली होती. या बदलाच्या अंमलबजावणीला सुरुवात होत असल्याची घोषणाही काल महाराष्ट्रात करण्यात आली होती.
काँग्रेसच्या या अभियानाला नसीम खान यांच्यापासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार त्यांनी काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नसीम खान यांच्याकडे पूर्वी दोन पदं होती. यापैकी प्रदेश कँग्रेसचं कार्याध्यक्षपद आणि मुंबई काँग्रेसच्या प्राचार समितीचं अध्यक्षपद होते. यांपैकी त्यांनी प्राचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीतीत खान यांनी मुंबई काँग्रेसच्या बैठकीत ही घोषणा केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.