Nana Patole : 'काश्मीर फाइल्‍सप्रमाणंच केरळ स्‍टोरी भाजपच्या मदतीला, धर्माच्या नावावर तोडायचा प्रयत्‍न'

मूळ प्रश्‍‍नांपासून जनतेला दूर नेत धर्माच्‍या नावावर तोडायचा प्रयत्‍न भाजपकडून सुरू आहे.
Nana Patole
Nana Patoleesakal
Updated on
Summary

सावरकर हा आमचा विषय नाही, आम्‍ही त्‍यावर कधीही बोलत नाही.

सातारा : देशातील जनतेला कोणत्‍या गोष्‍टींना किती महत्त्‍व द्यायचे याचे भान आहे. मध्‍यंतरीच्‍या काळात काश्मीर फाइल्‍सचा आधार निवडणुकीसाठी घेण्‍यात आला. त्‍याच धर्तीवर आता केरला स्‍टोरीचा आधार घेण्‍यात येत आहे. जनता शिक्षित असून, काश्मीर फाइल्‍सप्रमाणेच (Kashmir Files) केरळ स्‍टोरी (Kerala Story) त्‍यांच्‍या मदतीला धावली नसल्‍याचे काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

Nana Patole
Shambhuraj Desai : 'कोणतंही नियमबाह्य काम आम्ही 40 आमदारांनी केलेलं नाही, न्यायालयात आमची बाजू भक्कम'

या वेळी काँग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश सचिव रणजितसिंह देशमुख यांच्‍यासह इतर पदाधिकारी उपस्‍थित होते. श्री. पटोल (Nana Patole) म्‍हणाले, ‘‘गुजरातमधून ४० हजार महिला, युवती बेपत्ता झाल्‍याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. केंद्र आणि राज्‍याची सत्ता त्‍यांच्‍या ताब्‍यात आहे, तरीही त्‍याठिकाणच्‍या आयाबहिणी असुरक्षित आहेत. गुजरातनंतर महाराष्‍ट्राचा क्रमांक लागतो. येथील गृहमंत्री त्‍यांच्‍याच विचारांचा आहे. यावरून केंद्र, गुजरात आणि राज्‍यातील सरकार आयाबहिणींचे संरक्षण करू शकत नसल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे.

दिल्‍लीतील जंतरमंतरवर देशासाठी सुवर्णपदके आणणाऱ्या महिला पैलवानांचे लैंगिक शोषणाविरोधातील आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन भाजपचे खासदार ब्रूजभूषण सिंहच्‍या विरोधात असून, त्‍याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी शब्‍द काढायला तयार नाहीत.’’

Nana Patole
Karnataka Election : मुख्यमंत्रीपदावरून वाद नाहीच ! कॉंग्रेसने आणला शिवकुमार-सिद्धरामय्या यांच्या दोस्तीचा Video

मूळ प्रश्‍‍नांपासून जनतेला दूर नेत धर्माच्‍या नावावर तोडायचा प्रयत्‍न भाजपकडून सुरू आहे. या प्रयत्‍नांना सुशिक्षित जनता कधीही साथ देणार नाही. धर्माच्‍या नावावर मते मागून झाल्‍यानंतर आता देवांच्‍या नावावर मते मागण्‍याचा प्रयत्‍न भाजप कर्नाटकमध्‍ये करत बजरंग बलीचा आसरा घेतला आहे. बजरंग बली आमच्‍या बाजूने असून, त्‍यांची मंदिरे आम्‍ही प्रत्‍येक भागात उभारण्‍याचा निर्णय घेतला आहे. महागाईच्‍या मुद्द्यावर जनता त्रस्‍त असून, त्‍याविरोधात आवाज उठविण्‍याचे काम काँग्रेस करीत असल्‍याचेही त्‍यांनी या वेळी सांगितले.

सरकारचा कालावधी संपण्‍यास काही महिन्‍यांचा कालावधी उरला असून, या काळात एकमेकांच्‍या पक्षातील नेत्‍यांना खेचण्‍याचे प्रयत्‍न होतील आणि तसा प्रयत्‍न नुकताच महाड येथे शिवसेनेने केल्‍याबाबत विचारले असता श्री. पटोले यांनी माझ्‍याकडे अनेक फॉर्म्युला आहेत. यापुढील काळात तसे होणार नाही व ते होऊ नये, यासाठी आम्‍ही मित्रांना समजावून सांगू, असे सांगितले.

Nana Patole
Jiva Mahale : शिवरायांचे अंगरक्षक जिवा महालेंच्या वंशजाला मिसेस मुख्यमंत्र्यांची लाखमोलाची मदत

देशविरोधी कारवाया चुकीच्या : पटोले

सावरकर हा आमचा विषय नाही, आम्‍ही त्‍यावर कधीही बोलत नाही. महागाई हा मुद्दा आमच्‍यासाठी जास्‍त महत्त्‍वाचा आहे. डीआरडीओमधील शास्‍त्रज्ञ प्रदीप कुरुलकर पाकिस्‍तानला माहिती पुरवत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर त्‍यांच्‍यावर कारवाई झाल्‍याच्‍या मुद्द्यावर कोणीही असो, कोणत्‍याही विचारधारेचा असू. देशविरोधी कारवाया करणे चुकीचे असल्‍याची प्रतिक्रियाही श्री. पटोले यांनी या वेळी नोंदवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.