काँग्रेस पक्षात कुठली भीती नाही. त्यामुळे आम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही. आमच्या पक्षात फूट पडेल असं मला वाटत नाही, असे देखील नाना पटोले म्हणाले.
रत्नागिरी : महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी राजकीय घटना घडलेली आहे. एकीकडे समृद्धी महामार्गावरची अपघाताची घटना आहे. त्यातील मृतदेह जळत असताना दुसरीकडे राजभवनात जयघोष चालू होता.
राज्याच्या इतिहासातला हा काळा दिवस आहे. यांना पाप करायचं होतं तर दोन-चार दिवस मागे-पुढे करायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देत भाजप आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड उपस्थित होते. नाना पटोले म्हणाले, भाजपचे कृत्य सर्वांना कळलेले आहे. भाजपने २ भाग पाडलेले आहेत, भय आणि भ्रष्टाचार आणि त्या माध्यमातून घाणेरडे कृत्य ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून केलं जात आहे.
शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात जे पाप घडले आहे, त्याचे परिणाम भाजपला येणाऱ्या काळात भोगावे लागतील आणि महाराष्ट्राची जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. दरम्यान, जे कोणी काँग्रेसबरोबर उभे असतील, त्यांना सोबत घेऊन चालू, ’ही काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील सरकारने संविधांनिक व्यवस्थेचे तीनतेरा वाजवलेले आहेत. महाविकास आघाडी ही कायम राहील. विरोधी पक्षनेतेसंदर्भात बसून निर्णय होईल.
राज्यातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा यांची चाचणी काँग्रेस करत आहे. महाराष्ट्रातील मूळ पक्ष काँग्रेसच, ही चाचणी आम्ही लपून नाही तर जाहीरपणे करतो आहोत. मित्रपक्षालासुद्धा ताकद देण्याचे काम आम्ही करू. काँग्रेस पक्षात कुठली भीती नाही. त्यामुळे आम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही. आमच्या पक्षात फूट पडेल असं मला वाटत नाही, असे देखील नाना पटोले म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.