मुंबई : दरवर्षी मोठ्या उत्साहात 19 फेब्रुवारी रोजी शासनाच्यावतीने शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी केली जाते. तसेच काही शिवप्रेमी तिथीनुसार म्हणजेच 19 मार्च रोजीदेखील शिवजयंती साजरी करतात. परंतु, तिथीनुसार (फाल्गुन कृष्ण चतुर्थी) साजरी होणाऱ्या शिवजयंतीबाबत काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती सार्वजनिक स्वरुपात साजरी न करता प्रत्येक घरात शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (Congress Bhai Jagtap Letter To CM Uddhav Thackeray )
भाई जगताप यांनी दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, तिथीनुसार (19 मार्च) साजरी होणारी शिवजयंती सार्वजनिक स्वरुपात साजरी न करता प्रत्येक घरात शिवजयंती साजरी करण्याचे, तसेच सणाचे स्वरुप प्राप्त करून देऊन पुरोगामी महाराष्ट्राला साजेसा पायंडा पाडण्याचे आवाहन केले आहे. तसेच शिवजयंती घराघरात, शिवजयंती मनामनात या उक्तीप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली शिवप्रेरणा आपण सर्वजण घेऊया असे त्यांनी म्हटले आहे. तसेच याची सुरुवात मुख्यमंत्री निवास असलेल्या आपल्या वर्षा निवासस्थानापासून करावी असे त्यांनी म्हटले आहे.
यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींसह यात सहभागी होऊन, शिवप्रेमी आणि महाराष्ट्राच्या जनतेला शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनकारी वातावरण निर्माण करून, तिथीनुसार शिवजयंती प्रत्येक घरात साजरी करावी, असे आवाहन करण्याची मागणी भाई जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.