धायरी : जरंडेश्वर साखर कारखान्यानंतर पारनेरच्या साखर कारखान्यांतील घोटाळ्याबाबत पुरावे सादर करणार असल्याची माहिती भाजपनेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तसेच गुरुवारी पारनेर साखर कारखान्याची पाहणीही करणार असल्याचे सोमय्या म्हणाले. आज (ता. २०) सोमवारी त्यांनी नऱ्हे येथे माध्यमांशी संवाद साधला.
सोमय्या म्हणाले, उद्या ईडीकडे गडहिंग्लज कारखान्याबाबत तक्रार करणार आहे. गुरुवारी पारनेर साखर कारखाना येथे पाहणी करणार असून पारनेर कारखान्यात पवार यांचे जवळचे मित्र अतुल चोरडिया यांनी २३ कोटी रुपये दिले आहेत. या बाबतीत ईडीसोबत चर्चा करणार असल्याचे सांगून त्यांनी आयकर विभाग व सहकार मंत्रालयाची चौकशी सुरू असल्याचे म्हटले. ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी गडहिंग्लज साखर कारखाना कसा काबीज केला, हसन मुश्रीफ यांनी बेनामी कंपनीला कसा दिला याचे पुरावे त्यांच्याकडे असल्याचेही त्यांनी त्यांनी सांगितले.
यापूर्वी माझ्या पत्नीवर आरोप केले, माझी थोडी जर चूक असती तर मला ठाकरे सरकारने अंदमान निकोबारला पाठवलं असतं, असेही सोमय्या यावेळी म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना सोमय्या यांच्यासोबत यावेळी खडकवासला खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर, जिल्हा परिषद सदस्य जयश्री भूमकर, संदीप खर्डेकर, सचिन मोरे,नगरसेवक प्रसन्न जगताप,सागर भूमकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.