Shivsena: आमदार अपात्रतेसंबंधी सलग सुनावणी; ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंची साक्ष पूर्ण, कालच्या सुनावणीवेळी काय घडलं?

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ डिसेंबर पर्यंत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार असल्याने पुढील सात दिवस ही सुनावणी होणार आहे.
Shivsena
ShivsenaEsakal
Updated on

शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीला आजपासून पुन्हा सुरुवात झाली असून यापुढे सलग सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ डिसेंबर पर्यंत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार असल्याने पुढील सात दिवस ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान सर्व आमदारांची उलट तपासणी करण्यात येणार आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) प्रतोद सुनील प्रभू यांची आज उलटतपासणी करण्यात आली. शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाची बाजू मांडली.

विधानसभेत आज आमदार अपात्रता सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली. आजच्या कामकाजात शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये झालेल्या खडाजंगीमध्ये जेठमलानी यांनी प्रभूंना अडचणीचे प्रश्न विचारले. मात्र, प्रभू यांनी संयमी उत्तरे दिली.

जेठमलानी यांनी प्रभू याना याचिका इंग्रजीत दाखल केल्या का आणि केल्या असलतील तर तर त्याचा तपशील तुम्हला मराठीत समजावून सांगितलं गेला आहे का असे प्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण सादर केलेले सर्व कागपत्रे आणि पुरावे हे रेकॉर्ड वर असल्याचे सांगत प्रभू यांनी जेठमलानी याना प्रत्युत्तर दिले.

Shivsena
Pasha Patel : माजी आमदार पाशा पटेलांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा; पटेल म्हणाले, महायुतीनं माझ्यावर..

आमदार अपात्रतेसंबंधी आता सलग सुनावणी

यावर अध्यक्षांनी प्रभू याना इंगर्जी भाषा येते का असा प्रश विचारून त्यांची कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. "मला इंग्रजी भाषा वाचता येते आणि समजते. मात्र मला माझ्या भाषेत समजते. त्या संदर्भात मी कांन्फडन्ट आहे.," असे उत्तर प्रभू यांनी दिले.

त्यांनतर जेठमलानी यांनी आपल्या पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून निवडणूक लढविली असल्याचा प्रश्न जेठमलानी यांनी विचारला असता, मला माझ्या पक्षाने एबी फॉर्म दिला होता. त्यानुसार आपण निवडणूक लढविली असल्याचे प्रभू यांनी सांगितले. तसेच निवडणूक प्रचारात आपण काँग्रेस किंवा अन्य पक्षाच्या उमेद्वाराव टीका केली नाही, कारण मी केवळ माझ्या केलेल्या कामाच्या जोरावर मते मागितली असल्याचे प्रभू यांनी सुनावले.

Shivsena
Eknath Shinde : राज्यातील शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांची अंबाबाई दर्शनानंतर ग्वाही

आजपासून (ता. २२) येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी होणार आहे. त्यानंतर तीन दिवसांच्या सुट्टीनंतर २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर सलग सात दिवस सुनावणी होणार आहे. रविवारी ३ डिसेंबर रोजीदेखील सुनावणी पार पडणार आहे. यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही बाजूकडील आमदारांच्या साक्षी नोंदवण्यात येणार आहे. त्याशिवाय, व्हीप बजावणाऱ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचीही साक्ष‌ ‌नोंदवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेच्या आमदारांनी दाखल केलेल्या ३४ याचिकांचे सहा गट करून ही सुनावणी घेण्यात येणार आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घेय्नाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.