देश संविधान अमृत महोत्सव साजरा करणार आहे. तर सध्या देशात संविधानाबाबत संभ्रम आणि अफवा पसरल्या आहेत. हे संभ्रम आणि अफवा दूर करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. याबाबत संविधान जागर समितीने कृती आराखडा तयार केला आहे. या आरखड्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. यामध्ये संविधान जागर यात्रा 2024 हा कार्यक्रम महत्वाचा असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेला अनुसरून राष्ट्रीय समाजाची निर्मिती करणे आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि बंधुत्वाची जाणीव निर्माण करून संविधानप्रेमी समाज निर्माण करणे हा यात्रेचा उद्देश आहे.