Contract Recruitment: "इट्स अ जोक यार... गुणवत्ता असलेले आरोप करा"; सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Contract Recruitment
Contract Recruitment
Updated on

Contract Recruitment: कंत्राटी भरतीचा जीआर रद्द झाला तरी राजकारण थांबलं नाही. विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी कत्रांटी भरतीचा जीआर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आणला होता, हे गेल्या सरकारचे पाप आहे, असा आरोप केला होता. त्यामुळे विरोधक देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी. बिचारे देवेंद्र फडणवीस गोंधळात आहेत. त्यांचं  खूपच डिमोशन झालं आहे. त्यामुळे मला देवेंद्रजी यांच्याबाबत खूप वाईट वाटतं. जो माणूस मुख्यमंत्री होता त्याला उपमुख्यमंत्री करण्यात आलं. त्यांच्याबद्दल मला खूप आस्था, आदर आहे. त्यांच्यावर अन्याय झाला त्यामुळे ते गोंधळात आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर वाचला. त्यामध्ये  शरद पवार मंत्री होते का? शरद पवारांचा रोल काय होता? त्या जीआरमध्ये, २०११ मध्ये उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते का? इट्स अ जोक यार. जेव्हा आरोप करता तेव्हा गुणवत्ता असलेले करा. देवेंद्रजी तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. जे आज सत्तेमध्ये आहेत तेच २०११ ला सत्तेत होते. महाराष्ट्राची दिशाभूल कोणी केली असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी आधी माफी मागायला पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Contract Recruitment
Pune PMPML News: पुण्यात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती; PMPML बस चालकाने गाड्यांना उडवलं

अजित पवार, शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा कार्यक्रम विद्या प्रतिष्ठानचा आहे. या कार्यक्रमाला सगळे पवार कुटुंब येणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचा प्रश्नच नाही. सामाजिक काम आहे आमची समाजिक बांधिलकी आहे की नाही. राजकारणाच्या चौकटीतून सगळं बघू नका.

भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती जिंकणार असा दावा केला होता, यावर सुळे म्हणाल्या, "अतिथि देवो भव.  सर्वांना बारामती हवीहवीशी आहे. त्यामुळे सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना चांगलीच गोष्ट हवी असते. बारामती हाय परफॉर्मन्स मतदारसंघ आहे. ही लोकशाही आहे. कुणी तरी माझ्या विरोधात लढल पाहिजे. बावनकुळे येत असतील तर त्यांचं स्वागत आहे."

Contract Recruitment
NCP Crisis: उद्या शरद पवार, अजित पवार माढ्यात; राजकीय वेळ साधणार कोण! दोन्ही गटापुढे गर्दी जमविण्याचे आव्हान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.