Contract Recruitment: मागच्या सरकारचे पाप मग GR आताच रद्द का केला? देवेंद्र फडणवीसांना पत्रकार परिषदेत सवाल

Devendra Fadnavis: The sin is on the government's head; Fadnavis mandal points finger at government for cancellation of contractual recruitment, Is the government afraid of youth?
Contract Recruitment
Contract RecruitmentEsakal
Updated on

Contract Recruitment: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे. फडणवीस यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर कंत्राटी पद्धीचा जीआर काढल्याचे खापर फोडले. हा निर्णय उद्धव ठाकरे सरकारच्या काळात झाला होता. त्यामुळे शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रसने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेत येऊन दिड वर्ष झाले. तर कंत्राटी पद्धतीचा जीआर आता का रद्द केला. कंत्राटी भरती उद्धव ठाकरे आणि शरद पवार सरकारचं पाप आहे तर मग शिंदे फडणवीस सरकारने हा जीआर नियमित का ठेवला. आता जीआर मागे का घेतला? हा विरोधकांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणायचा का? की सरकारवर ओढवलेली नामुष्की?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला.

Contract Recruitment
मध्य प्रदेशात CM होण्यासाठी तंत्र मंत्र, भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली! शिवराजसिंह चौहान म्हणाले...

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे टेंडर उद्धव ठाकरे सरकाने काढलं होतं. ते आमच्या कॅबीनेटमध्ये आलं त्यावेळी मी पत्र दिली कि यात २५ टक्के दर जास्त आहेत ते कमी करा. ज्यावेळी यांनी आमच्यावर आरोप लावले त्यावेळी आम्ही हे गंभीरतेने घेतले. यांनीच केलं आणि आमच्यावर आरोप का लावत आहेत. 

त्यानंतर आमचं असं मत झालं की आम्हाला याची गरज नाही आहे, आमचं धोरण देखील असं नाही. त्यामुळे ही नामुष्की नाही आहे. राज्यातील युवकांच्या मनात जो रोष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु होता तो आम्ही संपवला आहे. हे सरकारचं काम आहे. आम्ही विरोधकांचा बुरखा फाडला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Contract Recruitment
Contractual Recruitment: "त्यांचं पाप आमच्या माथी नको"; फडणवीसांनी मांडला कंत्राटी भरतीचा लेखाजोखा, उबाठा सरकारचे जीआर केले रद्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.