"महाराष्ट्र - गोवा व्यापार वृध्दीसाठी महाराष्ट्र चेंबर सोबत सहकार्य"

गोव्याच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शिष्टमंडळास आश्वासन
Pramod sawant
Pramod sawantsakal media
Updated on

मुंबई : महाराष्ट्र-गोवा व्यापारवृद्धीसाठी (Maharashtra-goa trading expansion) महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरने (Maharashtra Chamber of Commerce, Industry & Agriculture) दिलेल्या विविध संयुक्त उपक्रमांच्या प्रस्तांवासाठी सहकार्य करू अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod sawant) यांनी महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्यांना दिली. (cooperation with Maharashtra chamber for expansion of Maharashtra-goa trading)

Pramod sawant
परळ रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मिठी मारत अश्लील शेरेबाजी

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज (ता. 1) कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. त्यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी सावंत यांनी वरीलप्रमाणे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यात उद्योग-व्यापार-पर्यटन व आय.टी. क्षेत्रात सहकार्याबाबतच्या विविध योजनांचा प्रस्ताव सादर केला.

महाराष्ट्र व गोवा या दोन्ही शेजारी राज्यांत सांस्कृतिक व व्यापारी, ॠणानुबंध आहे. याचा फायदा घेऊन दोन्ही राज्यात पर्यटन आणि व्यापार-उद्योग वाढवता येईल, असे गांधी यांनी सांगितले. आंतरराज्य व्यापार-उद्योग वृध्दिसाठी महाराष्ट्र चेंबर ने दिलेल्या विविध संयुक्त उपक्रमांच्या प्रस्तांवासाठी सहकार्य करू अशी ग्वाही सावंत यांनी दिली.

या प्रस्तावावर सर्व संबंधितांशी चर्चा करून पुढील निर्णयासाठी लवकरच पणजी येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकार्‍यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल असेही सावंत यांनी नमुद केले. या शिष्टमंडळात भरत गांधी, योगेश केरकर, परशुराम सातार्डेकर, दर्शन गांधी यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.