मुंबई : आज राज्यात नवीन रुग्णांसह (corona new patients) मृत्यूचा आकडा कालच्या तुलनेत काहीसा वाढला. आज 18,067 नवीन रुग्ण तर 79 रुग्णांचा मृत्यू (corona deaths) झाला आहे. मृतांचा एकूण आकडा 1,42,784 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 1.84 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. औरंगाबाद मंडळात मृत्यूंची नोंद झाली नाही.ठाणे 26,नाशिक 10,पुणे 16,कोल्हापूर 7,लातूर 10,अकोला 5,नागपूर 5 मृत्यू नोंदवले गेले.
आज 18,067 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील एकूण संख्या 77,53,548 झाली आहे.राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आज 36,281 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 74,33,633 इतकी आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 95.87 % एवढे झाले आहे. सध्या राज्यात 9,73,417 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,617 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 1,73,221 इतकी झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.