सोलापूर : संपूर्ण जगाला दोन वर्षांपासून वेठीस धरणारा आणि सर्वसामान्यांचे जीणे मुश्किल करणारा कोरोना आता परतीच्या वाटेवर आहे. राज्यात सध्या 892 सक्रिय रुग्ण असून वाशिम, हिंगोली, यवतमाळ हे तीन जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. आता 11 जिल्हे कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असून त्या प्रत्येक जिल्ह्यात एक ते तीन सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यातील शहर-ग्रामीणमधील कोरोना आता हद्दपार होऊ लागला आहे. कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे आटोक्यात आली असून, बहुतेक शहरे तर काही जिल्ह्यांमधील ग्रामीण भाग कोरोनामुक्त झाला आहे. सोलापूर शहर कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सहा तालुकेही कोरोनामुक्त झाले आहेत. आता ग्रामीणमध्ये केवळ नऊ सक्रिय रुग्ण आहेत. विशेष बाब म्हणजे कोरोनाच्या दोन्ही लाटेत रुग्णवाढ व मृत्युदरात सोलापूर, नाशिक, सांगली हे जिल्हे राज्यात टॉपटेनमध्ये होते. स्मशानभूमीतही वेटिंग लागले होते. संपूर्ण जगाला वेठीस धरणारा कोरोना आता जिल्ह्यातून परतीच्या वाटेवर आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा, माळशिरस, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व पंढरपूर हे तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. बार्शी व मंगळवेढा हे दोन्ही तालुके कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असून, दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी एक सक्रिय रुग्ण आहे. दुसरीकडे माढा व सांगोला तालुक्यात प्रत्येकी दोन आणि मोहोळ तालुक्यात सर्वाधिक तीन सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख हजार व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. त्यातील पाच हजार रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर दुसरीकडे म्युकरमायकोसिस या आजाराने रुग्णांचा बळी घेतला. दिलासादायक बाब म्हणजे शहरातील हजार तर ग्रामीणमधील एक लाख हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली. प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतल्याने तिसऱ्या लाटेत अधिक रुग्ण असतानाही रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण खूपच अत्यल्प राहिले. दरम्यान, अजूनही ज्यांनी प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस तथा लसच घेतलेली नाही, त्यांनी लस टोचून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावरील जिल्हे
नाशिक, नंदुरबार, धुळे, जालना, परभणी, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव व सांगली हे जिल्हे आता कोरोनामुक्तीच्या खूपच नजीक आहेत. या तालुक्यांमध्ये प्रतयेकी एक ते तीनपर्यंतच रुग्ण सध्या आहेत. त्यातील बहुतेक रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वत:च्या घरातूनच उपचार घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.