मुंबई- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आपल्या संबोधनात या बोलतील याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्र्यांनी सध्यातरी राज्यात लॉकडाऊन करणार नसल्याचं म्हटलं आहे. पण, येत्या काळात निर्बंध अधिक कठोर करण्यात येतील असं ते म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावेळी नाव न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. अनेकजण मास्क लावत नाहीयेत. मास्क न लावण्यात काय शौर्य आहे, मी मास्क वापरत वाही, वापरणार नाही. मास्क न वापरण्यात कसली आलीये शूरता. तसेच मास्क लावण्यात लाजण्याचे कारण नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना माध्यमांनी मास्क का वापरत नाही, असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना त्यांनी मी मास्क वापरत नाही, कधीही वापरला नाही, असं म्हटलं होतं.
लस घेतली म्हणजे आता कोरोना होणार नाही अशातही भाग नाही. कोरोना होईल, फक्त त्याची सक्रियता कमी असेल, विषाणू कमी घातक ठरेल. लस घेतल्यानंतरही मास्क लावणे आवश्यक आहे, अंतर ठेवलंच पाहिजे हात धुत राहिलंच पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. लस घेणं, टेस्ट वाढवणं, चाचण्या वाढवणं हा उपाय अजून तरी मी मानायला तयार नाही. रुग्णवाढ थांबवण्यासाठी अजून कोणी उपाय सांगत नाहीय. संपूर्ण देशात आपलं राज्य हे लस देणारं नंबर एकचं राज्य आहे. लसीचा पुरवठा जास्त होईल तेव्हा ही क्षमता आपण दुप्पटीने लस देऊ शकतो, असंही ते म्हणाले. .
मनुष्यबळ कुठून आणणार
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर सुविधा अपुऱ्या पडतील. सुविधा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. साधने वाढली तरी मनुष्यबळ कुठून आणणार असा प्रश्न आहे. याचीच चिंता मोठी आहे. डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बरं झाल्यानंतर त्यांची कार्यक्षमता थोडी कमी होते. त्यांना थकवा आलेला असतो आणि आरामाची गरज असते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.