२६ जिल्ह्यांची मिटली चिंता! मुंबई, ठाणे, पुणे, नगरमध्येच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये राज्यातील तब्बल आठ कोटी संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. ७८ लाख ७४ हजारांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. या विषाणूने अनेक कुटुंबातील कर्ता हिरावून नेला. अनेक चिमुकल्यांना पोरकं तर अनेक मातांना विधवा केले. काही वृध्द माता-पित्यांचा आधार हिरावून नेला. पण, आता कोरोना परतीच्या वाटेवर असून नऊ जिल्हे असून १७ जिल्हे कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत
corona update
corona updateesakal
Updated on

सोलापूर : संपूर्ण जगाला वेठीस धरणारा कोरोना आता राज्यातून परतीच्या वाटेवर आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये राज्यातील तब्बल आठ कोटी संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ७८ लाख ७४ हजारांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. सर्वात दु:खद बाब म्हणजे या विषाणूने अनेक कुटुंबातील कर्ता हिरावून नेला. तर अनेक चिमुकल्यांना पोरकं तर अनेक मातांना विधवा केले. काही वृध्द माता-पित्यांचा आधार हिरावून नेला. मार्च २०२० पासून आतापर्यंत एक लाख ४७ हजार ७८९ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पण, आता कोरोना परतीच्या वाटेवर असून नऊ जिल्हे असून १७ जिल्हे कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत.

corona update
राज ठाकरे सत्यच बोलले, महाविकास आघाडीने... - फडणवीस

राज्यात सध्या ९२१ सक्रिय रुग्ण असून मुंबई, ठाणे, पुणे, नगरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पण, प्रतिबंधित लसीमुळे बहुतेक रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू झाले. त्यानंतर एकापाठोपाठ तीन लाटा येऊन गेल्या. तत्पूर्वी, सुरवातीला १८ वर्षांवरील व्यक्तींसह पूर्वीचे गंभीर आजा असलेल्यांना लस टोचण्यात आली. त्यानंतर आता १२ वर्षांवरील प्रत्येकोला लस टोचली जात आहे. त्यातून कोरोना आटोक्यात आला असून त्यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलिस, आशासेविका, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोठे योगदान राहिले आहे. राज्यातील सर्व निर्बंध उठल्यानंतर सर्वांनी एक मोकळा श्वास घेतला आहे. अनेकजण परगावी जात असून बहुतेक लोक कुटुंबियांसमवेत खरेदीसाठी बाजारात येत आहेत. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण सध्या ९८.११ टक्के आहे.

corona update
नाशिक रेल्वे अपघात : ८ एक्सप्रेस रद्द, ६ गाड्यांचे मार्ग बदलले

राज्यातील कोरोनामुक्त जिल्हे...
राज्यातील भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अकोला, हिंगोली, नांदेड, परभणी, नंदुरबार हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर दुसरीकडे पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, धुळे, जालना, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली हे १७ जिल्हे कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्या प्रत्येक जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या दहापेक्षा कमी आहे.

corona update
ED मुळे फायरब्रँड राज ठाकरे हे 'फ्लाॅवर' का झाले? : रूपाली ठोंबरे
  • ठळक बाबी...
    - कोरोना काळात आतापर्यंत आठ कोटी संशयितांच्या पार पडल्या चाचण्या
    - आतापर्यंत राज्यातील ७८ लाख ७४ हजार ३९४ जणांना झाली कोरोनाची बाधा
    - कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये राज्यातील एक लाख ४७ हजार ७८९ रुग्णांचा झाला मृत्यू
    - राज्यात सध्या कोरोनाचे ९२१ रुग्ण; मुंबई, ठाणे, पुणे, नगरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण
    - नऊ जिल्हे कोरोनामुक्त झाले असून १७ जिल्ह्यातूनही कोरोना परतीच्या वाटेवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.