पुणे - राज्यात कोरोनाच्या ‘जेएन.१’ या नवीन व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात कोरोना रुग्णांसाठी चार हजार ७०० खाटांची व्यवस्था केली आहे. त्यात विलगीकरणापासून ते व्हेंटिलेटरपर्यंतच्या खाटांचा समावेश आहे.
राज्यात ‘जेएन.१’ या नवीन व्हेरियंटचा रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली. यात शहरातील उपलब्ध आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. या बाबत माहिती देताना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकाते म्हणाले, 'शहरात कोरोनाचा एकच रुग्ण आढळला आहे.
त्याचीही प्रकृती स्थिर असून, तो घरातच विलगीकरणात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. शहरात नवीन व्हेरियंटचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांपर्यंत पोचून त्याची कोरोना चाचणी करणे आणि त्यांना उपचार देणे याला प्राधान्य दिले आहे.’’
मॉकड्रिक केलेली रुग्णालये
रुग्णालये - संख्या
सरकारी रुग्णालये - ११
खासगी रुग्णालये - ९३
खासगी वैद्यकीय महाविद्यालये - २
खाटांची व्यवस्था
विलगीकरण कक्षातील खाटा - १,३०१
ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा - २,२९६
अतिदक्षता विभागातील खाटा - ६७४
व्हेंटिलेटर असलेल्या खाटा - ४२९
मनुष्यबळ
डॉक्टर - २,४४२
कोरोनासंदर्भात प्रशिक्षित डॉक्टर - १,४८२
उपलब्ध परिचारिका - ३,८४४
प्रशिक्षित परिचारिका - २,२४९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.