मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या (corona third wave) लाटेला रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा मंगळवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh tope) आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra shingane) यांनी मंत्रालयात (mantralay meeting) झालेल्या संयुक्त बैठकीत घेतला. राज्यात ऑक्सिजन निर्मितीचे (oxygen psa plant) पीएसए प्लांट महिनभरात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे त्याच बरोबर ऑक्सिजन साठवणुकीची क्षमता वाढवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
ऑक्सिजनची उपलब्धता, उत्पादन, साठवणूक, वितरण याबाबत चर्चा करण्यात आली. राज्यात सध्या सुमारे 2000 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात ऑक्सिजन निर्मितीचे 350 पीएसए प्लांट असून त्यातील 141 पूर्ण क्षमतेने कार्यरत असून उर्वरित येत्या महिन्याभरात कार्यान्वित करण्याचे निर्देश दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील 50 खाटा असलेल्या खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मितीसाठी पीएसए प्लांट बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील किती खासगी रुग्णालयांनी प्लांट बसविले आहेत याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी द्यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्धतेची क्षमता कळू शकेल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
ऑक्सिजन प्लांट मधून गळती होऊ नये यासाठी उत्पादकांनी आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सुरू असलेल्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीस अन्न व औषध विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, आयुक्त परिमल सिंग, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव दौलत देसाई, आरोग्य विभागाचे सहआयुक्त डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.