राज्यात कोविडची दुसरी लाट आटोक्यात; आठवड्यात 20 टक्के रुग्णांमध्ये घट

 corona patients
corona patients sakal media
Updated on

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची नोंद (corona patients) पाहता राज्यातील कोविडची दुसरी लाट (corona second wave) जवळजवळ आटोक्यात आल्याचे राज्य कोविड टास्क फोर्सच्या (corona task force) सदस्यांकडून सांगण्यात आले आहे.  एकीकडे राज्यातील कोविड रुग्णांची घट होत असली तरी मुंबईत एका आठवड्यात रुग्णांमध्ये वाढ (corona increases) झाली असून ही वाढ जवळपास 20 टक्क्यांएवढी आहे. 29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत राज्यात सुमारे 20 टक्के घट आहे , तर, याच कालावधीत मुंबईतील रुग्णांमध्ये (Mumbai corona) वाढ झाली आहे.

 corona patients
डोंबिवली: वाहतूक विभागाची रिक्षाचालकांवर कारवाई

तर, सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच मे महिन्यात राज्यात 23 ते 25 हजारांच्या घरात रुग्ण सापडत होते. मात्र, आता हीच संख्या 2 हजाराच्या घरात आली आहे. म्हणजेच गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत 90 टक्के घट झाली आहे. पण, मुंबईत एका आठवड्यातच 20 टक्के रुग्ण वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या गेल्या आठवड्याच्या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटली. मात्र, याच कालावधीत मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. राज्यात 22 एप्रिल या दिवशी सर्वाधिक 67 हजार 013 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

 corona patients
पनवेलची भातशेती पाण्याखाली; अतिवृष्टीमुळे तालुक्यातील २०० हेक्टर पिकाचे नुकसान

मात्र, आता रुग्णसंख्या 2 हजाराच्या घरात आहे.  तर, मुंबईत 11 एप्रिल या दिवशी 11,020 सर्वाधिक रुग्ण आढळले होते. आणि अजूनही 400 ते 500 च्या दरम्यान दररोज नव्या कोरोना रुग्णांची नोंद होते आहे. दरम्यान, राज्यातील अहमदनगर आणि सिंधूदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये फक्त जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचेही टास्क फोर्स सदस्यांकडून सांगण्यात आले आहे.  

दुसरी लाट संपली का ?

राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील दुसरी लाट संपली असं म्हणणे चुकीचे ठरणार नाही. फक्त अहमदनगर जिल्हा सोडल्यास बाकी इतर ठिकाणी तसे काळजीचे वातावरण नाही. मात्र, तरीही नागरिकांनी बेफिकिरिने वागू नये.

मुंबईत कोरोनाचे शेपूट लांब

"मुंबईत थोडीफार चढ-उतार बघायला मिळत आहे. पण, काळजीचे कारण नाही. मुंबईत कोरोनाची शेपूट लांब आहे. पण, त्यामुळे जास्त चिंता करण्याची गरज नाही. आपण सध्याची परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो.  राज्यातील काही जिल्हे जसे की अहमदनगर किंवा सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये जास्त काळजी घेण्याची गरज आहे. बाकी इतर ठिकाणी रुग्णसंख्या अगदीच कमी आहे. "

- डॉ. राहुल पंडीत, सदस्य, राज्य टास्क फोर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.