संशयित रुग्णांची पुन्हा सुरू होणार कोरोना चाचणी! सोलापूर झेडपीकडे चाचण्यांसाठी ११५३५ किट्‌स, लसीच्या २६७ व्हायल; 'यांना' घेता येईल लस

राज्यात सध्या कोरोनाचे ६८ रुग्ण सक्रिय आहेत. पण, ८९ टक्के रूग्ण होम क्वारंटाईन आहेत. तरी सावधगिरी म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना संशयितांच्या चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे कोरोना चाचण्यांसाठी ११,५३५ किट्‌स उपलब्ध आहेत.
कोरोना
कोरोनाई सकाळ
Updated on

सोलापूर : राज्यातील ‘जेएन-वन’ या विषाणूचा रूग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग अर्लट झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ६८ रुग्ण सक्रिय आहेत. पण, त्यातील ८९ टक्के रूग्ण होम क्वारंटाईन आहेत. तरीदेखील सावधगिरी म्हणून आरोग्याधिकाऱ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना संशयितांच्या चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे कोरोना चाचण्यांसाठी ११ हजार ५३५ किट्‌स उपलब्ध आहेत.

‘जेएन-वन’ हा विषाणू ‘ओमायक्रॉन’च्याच कुटुंबातील असून मागील पाच महिन्यांत त्याचा फारसा प्रभाव जाणवलेला नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, पण सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. यापूर्वी राज्यातील बहुतेक व्यक्तीचे लसीकरण झाल्याने या विषाणूची तीव्रता कमीच आहे. ज्येष्ठ नागरिक व कोमॉर्बिड (पूर्वीचे गंभीर आजार असलेले) रुग्णांनी गर्दीत जाणे टाळावे किंवा मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील मुंबई (३४), ठाणे (१४), पुणे (१०), रायगड (४), कोल्हापूर (१), सांगली (२) आणि नागपूर (१) येथे कोरोनाचे ६८ रूग्ण आहेत. तरीपण दिलासादायक बाब म्हणजे त्यातील ८९ टक्के रूग्ण गृह विलगीकरणात आहेत. कोरोनापेक्षा सध्या ‘जेएन-वन’बद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत. पण, घाबरण्यासारखे काहीही नाही, असे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

सोलापूरचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सर्वांना संशयितांच्या टेस्ट (चाचण्या) कराव्यात, ६० वर्षांवरील विशेषत: को-मॉर्बिड रुग्णांना (ज्यांनी तिसरा बूस्टर डोस घेतला नाही असे) लस टोचावी, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार चाचणी व लसीकरणाची सोय सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये असल्याचेही डॉ. नवले यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ठळक बाबी...

  • - ताप, सर्दी (सतत नाक गळणे) अशा संशयितांचीच डॉक्टरांच्या सल्ल्याने होणार चाचणी

  • - जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे १९०३ आरटीपीसीआर टेस्टच्या किट्‌स

  • - नऊ हजार ६३२ रॅपिड ॲन्टीजेन किट्‌स उपलब्ध असल्याची आरोग्याधिकाऱ्यांची माहिती

  • - जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे प्रतिबंधित लसीच्या २६७ व्हायल शिल्लक

  • - ६० वर्षांवरील विशेषत: पूर्वीचे गंभीर आजार असलेल्यांना दिला जाणार बूस्टर डोस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.