मुंबई : महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे. याआधी देखील राज्य सरकारने कडक नियम लागू केले आहेत. मात्र, तरीही कोरोनाचे संक्रमण आटोक्यात येताना दिसत नाहीये. या पार्श्वभूमीवर कठोर लॉकडाउन लागू होणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे.
महाराष्ट्र राज्यात आज कोरोनाचे नवे 67,468 रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 40,27,827 वर पोहोचली आहे. तर 568 जणांचा मृत्यू झाला आहे. आज बरे झालेल्या 54,985 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 6,95,747 वर पोहोचली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.15% झाले आहे.
मात्र, राज्यात उद्या 22 एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून नवे निर्बंध लागू होणार आहेत. आधीच्या नियमांहून हे नियम अधिक कडक असणार आहेत. ब्रेक दि चेनची अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे असतील -
लग्न समारंभात नियंमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार दंड
लग्नात फक्त 25 लोकांना परवानगी. एकाच हॅालमध्ये 2 तास कार्यक्रम
आंतरजिल्हा प्रवास फक्त महत्त्वाच्या कारणांसाठी
मुंबईत खासगी गाडीत प्रवास 50 टक्के क्षमतेने
सरकारी कार्यालय 15 टक्के क्षमतेने सुरु
खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु
लोकल ट्रेनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश. आयकार्ड तपासून तिकिट मिळेल
खासगी व सार्वजनिक वाहतूकही केवळ अत्यावश्यक लोकांसाठीच
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.