राज्यातील रुग्णसंख्या वाढली! काल दिवसभरात 40 हजारच्या पार

Corona Updates
Corona UpdatesSakal
Updated on

मुंबई: राज्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून चिंतेचं वातावरण आहे. ओमिक्रॉन (Omicron) या नव्या कोरोनाच्या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. देशात कोरोनाबाधितांची (Covid19) संख्या वेगाने वाढत चालली असून गेल्या चोवीस तासात देशभरात तब्बल १ लाख १७ हजार ९४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या पाहिली तर आतापर्यंत ३.५२ कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी ३.४३ कोटी बरे झाले असून ४.८३ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या साडेतीन लाख लोकांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल गुरुवारी राज्यात तब्बल ३६,२६५ नवीन रुग्णांचे निदान झाले तर १३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज राज्यात ४०,९२५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज २० करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०७% एवढा आहे.

Corona Updates
ओमिक्रॉन संसर्गाकडे दुर्लक्ष नको; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

आज १४,२५६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,४७,४१० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यातील राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.८% एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०१,४६,३२९ प्रयोगशाळा नमनुयाांपैकी ६८,३४,२२२ (९.७४ टक्के) नमुने पॉझिटीव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात ७,४२,६८४ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत तर १४६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.

ओमिक्रॉनविषयक सध्यस्थिती

आज राज्यात एकही नवीन ओमिक्रॉन रुग्ण आढळलेला नाही. आजपर्यंत राज्यात एकूण ८७६ ओमायक्रॉनधवषाणूबाधित रुग्ण सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.