Corona Update : राज्याला दिलासा; दिवसभरात ६० हजारांहून अधिक रुग्ण बरे

दिवसभरात ४८,४०१ नव्या रुग्णांची नोंद
Maharashtra Corona Update
Maharashtra Corona UpdateSakal Media
Updated on

मुंबई : राज्यासाठी आज दिलासादायक बातमी आहे कारण दिवसभरात राज्यात ६० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तसेच कालच्या तुलनेत नव्या रुग्णांची संख्याही घटली आहे. पुणे जिल्हा (Pune District), पुणे मनपा (PMC), मुंबई (Mumbai) आणि सातारा (Satara) जिल्ह्यात आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. (Corona Update Maharashtra More than 60000 patients are cured in a day)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात ४८,४०१ नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५१,०१,७३७ झाली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात ३,४४०, मुंबईत २,३९५, पुणे मनपाच्या हद्दीत २,११० तर सातारा जिल्ह्यात २,२८० येथे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. तसेच दिवसभरात ६०,२२६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ४४,०७,८१८ इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं असून ते ८६.४ टक्के एवढं झालं आहे.

राज्यात मृतांचा आकडा पुन्हा एकदा वाढला असून आज ५७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून येथे ६८ मृत्यू नोंदवण्यात आले. तर कल्याण-डोंबिवलीत ५०, नाशिक मनपात ३८, नागपूर मनपात ३४ मृत्यू झाले आहेत. राज्याचा मृत्यूचा दर 1.49 टक्के इतका आहे. आज नोंद झालेल्या ५७२ मृत्यूंपैकी ३१० मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ११६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. तर १३६ मृत्यू हे आठवड्यापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. राज्यात आज एकूण ६,१५,७८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९४,३८,७९७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५१,०१,७३७ (१७.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६,९६,८९६ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर २६,९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()