रुग्णसंख्या वाढतेय! राज्यात आज 26 हजाराहून अधिक नवे रुग्ण

corona update akola
corona update akolasakal media
Updated on

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता चिंतेचं वातावरण वाढलं आहे. सध्या या पार्श्वभूमीवर निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. राज्यात आज २६,५३८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९७,७७,००७ प्रयोगशाळा नमनुयाांपैकी ६७,५७,०३२ (९.६८ टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,१३,७५८ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत तर १३६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.

corona update akola
"मोदींचा ताफा अडवल्याप्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी जनतेची माफी मागावी"

आज ५,३३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,२४,२४७ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.५५% एवढे झाले आहे.

ओमिक्रॉनविषयक सध्यस्थिती

आज राज्यात १४४ ओमिक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण सापडले आहेत.

  • मुंबई – १००

  • नागपुर-११

  • ठाणे मनपा आणि पुणे मनपा - ७

  • पिंपरी चिंचवड– ६

  • कोल्हापूर- ५

  • अमरावती, उल्हासनगर आणि भिवंडी निजामपूर मनपा - प्रत्येकी २

  • पनवेल आणि उस्मानाबाद - प्रत्येकी १

आजपर्यंत राज्यात एकूण ७९७ ओमिक्रॉन विषाणूबाधित रुग्ण सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.