कुणी ऑक्सिजन देता का ऑक्सिजन? राज्यातील खासगी रुग्णालयात तुटवडा

Corona_Oxygen
Corona_Oxygen
Updated on

Coronavirus Updates: मुंबई : सरकारी रुग्णालयात गेल्या कोरोना संसर्गावेळी प्राणवायू (ऑक्सिजन) टंचाई निर्माण झाली होती. ती परिस्थिती लक्षात घेत यावेळी तेथे प्राण फुंकायला वायू आहे, पण खासगी रुग्णालये तळमळत आहेत. संसर्ग रोखण्यात गुंतलेल्या आरोग्य खात्याने प्राणवायूची जबाबदारी नियमानुसार अन्न व औषध प्रशासनावर सोपवली. या विभागाने आता ‘प्राणात वायू भरता का,’ अशी आर्त हाक देत छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक या राज्यात दूत धाडले आहेत.

मिनिटामागे प्रमाण वाढले
महाराष्ट्राच्या ज्या जिल्ह्यांत ऑक्सिजनची टंचाई भासण्याची शक्यता दिसते आहे, तेथे पुरवठ्यासाठी टॅंकर ठरविले जात आहेत. ५७ टॅंकरची सोय झाली आहे पण तरीही रुग्णाच्या श्वासाची सोय करता येईल काय, याबद्दल सगळेच साशंक आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णाला ३० ते ४० लिटर ऑक्सिजन दर मिनिटाला लागत असे. या वेळी हे प्रमाण तब्बल ८५ हजार लिटरपर्यंत पोचले आहे. हा बदल होत असला तरी वैद्यकीय क्षेत्रासाठी ती समस्या ठरत आहे. सध्या या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करून देणे आव्हान ठरत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी साधारणत: सहा टक्के रुग्णांना ऑक्सिजन द्यावा लागतो, हा समजही खोटा ठरत अशी गरज असणाऱ्यांचे प्रमाण राज्यात दहा टक्क्यांपर्यंत पोचले आहे.

मागणी व पुरवठ्यात तफावत
संपूर्ण देशात ७५० टन ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी तयार होतो. गेल्या सहा महिन्यात हे उत्पादन तब्बल दोन हजार ७०० टनापर्यंत गेल्याचे अखिल भारतीय औद्योगिक वायू उत्पादक संघाने सांगितले. औद्योगिक कारणासाठी केवळ २० टक्के ऑक्सिजन देण्याच्या नियमातही आता बदल करीत जवळपास सर्व पुरवठा रुग्णांकडे वळवला जात असल्या तरीही गरज वाढतच आहे. महाराष्ट्रात आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स आणि लिंड इंडिया ऑक्सिजन पुरवतात. उत्पादक ३० आणि ८८ पुरवठादार असतानाही सध्या मागणी व पुरवठ्यात प्रचंड तफावत आहे. मुंबईलगतच्या वसईसारख्या रुग्णालयातच ऑक्सिजनअभावी १२ जणांचे प्राण गेल्याने प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

रुग्णसंख्येनुसार नियोजन अपरिहार्य
उस्मानाबाद, बीड, नंदुरबार या भागात ऑक्सिजन पुरवणे आव्हानात्मक असल्याचे आरोग्य खात्याचे अधिकारी मान्य करतात. राज्यातील १४ जिल्ह्यांनी ऑक्सिजन तयार करणारे कारखाने उभे केले, मात्र टंचाई कुठे कशी निर्माण होईल, याचे प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णसंख्येनुसार नियोजन करणे अपरिहार्य आहे, हे आरोग्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांच्याकडे सोमवारी (ता.१२) झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले असल्याची माहिती उच्चपदस्थांनी दिली.

परराज्यातून पुरवठा
अन्न व औषध प्रशासनाने छत्तीसगडमधील भिलाई, कर्नाटकातील बेल्लारी आणि तेलंगणातील हैदराबादमधून ऑक्सिजन मिळेल, अशी तजवीज काल रात्री उशिरा केली. या औद्योगिक शहरातील हा ऑक्सिजन आता वैद्यकीय वापरासाठी आवश्यक ते बदल करून वापरला जाईल. मात्र तरीही प्रत्येक रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी त्याचा पुरवठा होऊ शकेल काय याबाबत शंका आहेच. रेमडेसिव्हिरपेक्षाही ऑक्सिजन आवश्यक झाला आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.