Maharashtra Coronavirus two years of pandemic : कोरोना महामारीने सगळ्या जगाला वेठीस धरले, जगभरातील लोकांच्या जीवनात कोरोनामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. या दरम्यान महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण सापडला त्याला बरोबर दोन वर्षे पुर्ण झाली आहेत. पुण्यातील एका जोडप्याने दुबईला जाताना केलेल्या कोरोना टेस्टमध्ये ते पॉझिटीव्ह आढळले होते. तर याच्याच दोन दिवसांनंतर, 11 मार्च रोजी मुंबईत पहिला कोरोना रुग्ण आढळला होता..
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, 9 मार्च 2020 आणि 2022 या दोन वर्षांच्या काळात राज्यातील 78.7 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आणि परिणामी तब्बल 1,43,745 लोकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त कोरोना प्रभावित राज्य ठरले आहे. राज्यात पहिल्या वर्षी 9.4 लाख प्रकरणे आणि 53,456 मृत्यूची नोंद झाली. डेल्टा व्हेरिएंटच्या लाटेमुळे दुसऱ्या वर्षी 47.5 लाख प्रकरणे आणि 86,310 मृत्यू झाले. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गोळा केलेल्या माहिती अहवालानुसार, या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तिसऱ्या लाटेत 11.4 लाख प्रकरणे आणि 2,000 हून अधिक मृत्यू झाले. तिसर्या लाटेत कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण तसेच मृत्यू दर (CFR) सर्वात कमी होता.
कोविड डेथ ऑडिट कमिटीचे प्रमुख डॉ अविनाश सुपे म्हणाले की, पहिल्या लाटेत मृत्यूचे प्रमाण जास्त होते कारण हा आजार नवीन होता आणि उपचार पद्धती विकसित होत होत्या. तर दुसऱ्या लाटेत, डेल्टामुळे अधिक गंभीर आजार होऊ लागला आणि ऑक्सिजन, बेड आणि औषधांच्या कमतरतेमुळे अधिक मृत्यूला कारणीभूत ठरले, असे जन आरोग्य अभियानाचे सह-संयोजक डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले. ते म्हणाले, “साथीच्या रोगाने आपल्याला शिकवले की आरोग्य सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेइतकीच महत्त्वाची आहे.”
दरम्यान कोरोना महामारीच्या काळात ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक असुरक्षित ठरले. 61-70 वयोगटातील लोकांना सर्वात जास्त फटका बसला आणि तिन्ही लाटांमध्ये 27-30% मृत्यू झाले. विशेष म्हणजे, जास्त वय असलेले ,सीपर जेष्ठ नागरिकाच्या वयोगटात मृत्युदर तुलनेने कमी होता; 20% मृत्यू 71-80 वयोगटातील होते. ऑक्टोजेनेरियन्ससाठी सीएफआर सुमारे 7% होता तर वय कमी असलेल्यांध्ये 1% पेक्षा कमी होता. कदाचित खूप जास्त वयस्कर लोक अधूनमधूनच घराबाहेर पडायचे आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू किंवा पॉझिटीव्हीटी दर कमी होता.
यामध्ये 1% पेक्षा कमी मृत्यू 10 वर्षाखालील मुलांमध्ये होते. संपूर्ण संख्येत, गेल्या दोन वर्षांत 200 हून अधिक मुलांचा कोरोना रोगामुळे मृत्यू झाला.पहिल्या लाटेत, 91 मृत्यूची नोंद झाली आणि दुसऱ्या लाटेत ती किरकोळ वाढून 105 वर पोहोचली. तिसऱ्या लाटेत 11 मुलांचा मृत्यू झाला. तज्ञांचे म्हणणे आहे की, बहुतेक रुग्णाना काही मूलभूत आरोग्य समस्या होत्या. 11 ते 20 वयोगटातील तरुणांमध्ये, जवळपास 500 मृत्यूची नोंद झाली आहे. भविष्यात अधिक साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी राज्याने योजना तयार करणे आवश्यक असल्याचे देखील मोरे म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.