Covid 19 Update: राज्यात कोरोनाचा धोका वाढला; 919 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; पुन्हा कोरोना निर्बंध लागणार?

covid 19
covid 19covid 19
Updated on

महाराष्ट्रात कोरोनाचा वेग थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. कोरोनाच्या वाढत्या आकड्यांमुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण पसरू लागले आहे. मंगळवारी (11 एप्रिल) राज्यात 919 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

covid 19
Ajit Pawar : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात नवा ट्विस्ट; आरोपपत्रातून अजित-सुनेत्रा पवारांचं नाव काढलं?

त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. दररोज नवीन कोरोना सक्रिय रूग्ण संख्येने देखील वाढ होत आहे. दरम्यान, देशातील काही राज्यांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे 4 हजार 875 सक्रिय रुग्ण आहेत. तर मृत्यू दर 1.82 टक्के असून बरे होण्याचे प्रमाण 98.12 टक्के आहे.

covid 19
Babri Demolition: चंद्रकांत पाटीलांच्या वक्तव्यावरून मनसेही आक्रमक; शेयर केला 'तो' Video

तर दिल्लीतील सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी सोमवार आणि मंगळवारी देशभरात मॉकड्रिल घेण्यात आली.

आरोग्य विभागाने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत 242, नागपुरमध्ये 105, पुण्यात 58 आणि नवी मुंबईत 57 रूग्ण आढळून आली आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गातून 710 रुग्ण बरे झाल्यानंतर मंगळवारी राज्यात बरे झालेल्यांची संख्या 79,97,840 वर पोहोचली आहे. राज्यात आता 4,875 रूग्ण उपचार घेत आहेत.

दरम्यान देशात पुन्हा कोरानाचा कहर पाहिला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा निर्बंध लागणार का असा प्रश्न नागरिकांसमोर पडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()