पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिर परिसरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता व यात्रा काळातील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी श्री विठ्ठल मंदिर परिसरात प्रारूप विकास आराखडा (कॉरिडॉर) राबवला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पुढच्या आषाढी यात्रेपूर्वी मंदिर परिसरात विकास आराखड्याचे काम सुरू होईल, असेही जिल्हाधिकारी यांनी नमूद केले.
आशीर्वाद म्हणाले, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने मंदिर परिसरात प्रारूप विकास आराखडा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर परिसरातील प्रारूप विकास आराखडा माझ्याच काळात पूर्ण केला जाईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य
मंदिर परिसरातील विकास आराखडा राबवताना स्थानिक नागरिक, विक्रेते, वारकरी यांना विश्वासात घेऊन तो पूर्ण केला जाईल. आराखडा राबवताना भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल, असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
दोन तासात मिळणार विठुरायाचे दर्शन
तासन्तास विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना अवघ्या दोन तासात दर्शन मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने तिरुपती बालाजीच्या धर्तीवर टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. येत्या कार्तिकी यात्रेला प्रयोगिक तत्त्वावर विठ्ठल मंदिरात टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे.
मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यासाठी आग्रह धरला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.