राऊत विधानभवनात पोहोचण्याआधीच कोर्टाचं समन्स, सोमय्यांमुळे पाय खोलात?

राऊतांना 4 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Sanjay Raut
Sanjay Raut sakal
Updated on

मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स जारी केलं आहे. राऊतांना 4 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्याविरोधात सार्वजनिक शौचालयांच्या उभारणीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप राऊतांनी केला होता. त्यामुळे याप्रकरणी किरीट दाम्पत्याने अवमान झाला असल्याची तक्रार दिली होती.

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत त्यांच्यावर आरोप करत आहेत. दरम्यान, मविआकडूनही सोमय्यांनी केलेल्या कथित घोटाळ्यांची माहिती बाहरे काढण्यात आली. मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली आहेत. त्यातील 16 शौचालयं बांधण्याचं कंत्राट हे मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. या कामात बनावट कागदपत्रं सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप राऊतांनी केला होता.

Sanjay Raut
पवारांनी ऐनवेळी मतांचा कोटा बदलला, रात्रीतून 'मविआ'ची समीकरणं फिरली

पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून सुमारे 100 कोटींचा हा घोटाळा आहे. मग घाण करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत? पुरावे कुठे आहेत हेही माहिती आहे, असं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं. यावर हे सर्व प्रतिमा मलिन करणारे आहे आणि जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारे असून यामुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली आहे, असा दावा करत मेधा सोमय्यांनी राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. त्याची दखल घेत न्यायालयानं राऊत यांना समन्स बजावत न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, टॉयलेट घोटाळा असा की, मिरा भाईंदर शहरात एकूण 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील 16 शौचालये बांधण्याच कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करुन, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता.

Sanjay Raut
Rajyasabha Election : सहावी जागा भाजपाकडे; पवारांचा पराभव करत महाडिक विजयी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.