नवी दिल्ली- मुंबई हायकोर्टाने विधानसभा अध्यक्ष आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस पाठवली आहे. ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र का केले नाही? असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. (Court notice to Maharashtra Speaker 14 Uddhav Sena MLAs on Shinde faction disqualification plea)
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनावाला यांनी नार्वेकर आणि ठाकरेंच्या १४ आमदारांना शपथपत्र सादर करण्यास सांगितलं आहे. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र करण्यात यावे यासाठी भरत गोगावले यांनी १२ जानेवारी रोजी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला होता. शिंदे गटाच्या १६ आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि शिवसेना कोणाची याबाबत नार्वेकरणांनी निर्णय दिला. त्यांनी शिंदे गटाची शिवसेना खरी असल्याचा निकाल दिलाय. तसेच दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. मात्र, या निर्णयामुळे शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट नाराज असल्याचं दिसत आहेत.
शिंदे गटाची शिवसेना खरी तर मग त्यांचे प्रतोद भरत गोगावले यांनी बजावलेला व्हीप ठाकरेंच्या आमदारांना का लागू झाला नाही. ठाकरेंच्या १४ आमदारांना देखील अपात्र करायला हवं होतं, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली. त्यानंतर शिंदे गटाने याच मुद्द्यावरुन कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला विरोध करत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे-ठाकरे गट आमनेसामने येणार आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.