लातूर, ता. २०ः ग्लोबल पुरस्कार प्राप्त डिसले गुरूजी (Global teacher Award 2020 Ranjitsinh Disale) यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या पत्नीचा कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी न्यायालयात शनिवारी (ता. २१) उपस्थितीत रहावे अशी नोटीस येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी (तिसरे) रणजितसिंह डिसले यांच्यासह चौघांना काढली आहे. बार्शी तालुक्यातील मुळचे असलेले रणजितसिंह डिसले गुरुजी हे सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.