महाराष्ट्र अनलॉक : 1 जूनपासून निर्बंध शिथिल होणार?

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray File Photo
Updated on

मुंबई - राज्यातील (Maharashtra) कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. सोमवारी दिवसभरात 22 हजार नवीन कोरोना रुग्ण सापडले. गेल्या महिन्याभरापासून ब्रेक द चेन (Break The Chain) मोहिमेंतर्गत असलेल्या लॉकडाऊनचे (Lockdown) नियम आता शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. 1 जूनपासून अनलॉक प्रक्रिया सुरु होऊ शकते. यामध्ये अत्यावश्यक सेवांशिवाय इतर दुकानेही सुरु कऱण्यासाठी परवानगी मिळू शकते. तसंच वेळेचे निर्बंधही काही प्रमाणात शिथिल होतील. सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी असलेली मर्यादाही वाढवण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने परिस्थिती पाहून 30 जूनपर्यंत चार टप्प्यात लॉकडाउन शिथिलतेच्या नियोजनाला सुरवात केली आहे. तिसऱ्या लाटेच्या शक्‍यतेमुळे काही निर्बंध पुढेही कायम राहतील. पहिल्या टप्प्यात दुकानांची वेळ सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत केली जाईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. (covid 19 cases drop now maharashtra may relaxation in lockdown)

महाराष्ट्रात सोमवारी 22 हजार 122 नवीन रुग्ण आढळले. गेल्या दोन महिन्यातील ही सर्वात कमी नवी रुग्णसंख्या आहे. 16 मार्चला राज्यात 17 हजार 864 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले होते. त्यानंतर सातत्यानं रुग्णसंख्येत वाढ होत होती. आतापर्यंत राज्यात 56 लाख 2 हजार 19 कोरोनाचे रुग्ण सापडले असून 89 हजार 212 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी एका दिवसात 361 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले.

Uddhav Thackeray
14 जूनपासून ऑनलाइन शाळा ! शालेय शिक्षण विभागाची सावध भूमिका

ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन लागू केल्यापासून राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. 30 एप्रिलला 1.45 टक्के इतका ग्रोथ रेट होता तो 18 मे रोजी 0.69 टक्के इतका झाला आहे. यामुळे आता निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली जात आहे. 5 एप्रिलपासून टप्प्या टप्प्याने लॉकडाऊन वाढवण्यात आला. आता 1 जूनला सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन असून पुढचा निर्णय य़ा आठवड्याच्या शेवटी राज्य सरकारकडून जाहीर केला जाऊ शकतो.

राज्य सरकार लॉकडाउन शिथिलतेबाबत जपून पाऊल टाकत आहे. एकाचवेळी नागरिकांची मोठी गर्दी होईल, अशा आस्थापनांना 30 जूनपर्यंत सवलती दिल्या जाणार नाहीत, असे नियोजन करण्यात आले आहे. लॉकडाउनमुळे अनेक उद्योग अडचणीत सापडले असून त्यांना सवलती दिल्या जातील. औद्योगिक कंपन्यांसाठी असलेले निर्बंध कमी केले जाऊ शकतात. तसंच वेळेची मर्यादा वाढवण्याची अपेक्षा आहे. सध्या सरकारी कार्यालयामध्ये 15 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे. त्यातही वाढ होऊ शकते. दुसरीकडे हॉटेल, मॉल, मल्टिप्लेक्स मात्र बंदच राहतील असं मंत्रायलायतील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.