कोरोनाच्या नव्या म्युटंटमुळे चिंता; राज्य सरकारला टास्क फोर्सची सूचना

कोरोना
कोरोनाsakal
Updated on
Summary

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच देशात कोरोना विषाणूचा नवीन म्युटेंट एवाय ४.२ आढळल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

मुंबई - कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच देशात कोरोना विषाणूचा नवीन म्युटेंट एवाय ४.२ आढळल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्याच्या कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी हा म्युटंट घातक नसल्याचे म्हटले आहे; मात्र डेल्टाचाच पुढील भाग असलेला हा म्युटेंट संक्रमणाच्या प्रभावी शक्यता असल्याने राज्य सरकारला खबरदारी घेण्याच्या सूचना टास्क फोर्सकडून करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या नवीन म्युटेंटने सध्या युरोपमध्ये दहशत निर्माण केली आहे. हा म्युटंट भारतात कमी संख्येत आहे. राज्य सरकारने याबाबत कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांशी बैठक घेत चर्चा केली आहे. सध्या राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवरही बाजारपेठा सार्वजनिक ठिकाणी गर्दा दिसू लागली आहे. त्यामुळे म्युटेंट लोकांसाठी घातक ठरू नये, यासाठी राज्य सरकारला खबरदारी घेण्याच्या सूचना टास्क फोर्सन केल्या आहेत. मुंबईत नवीन म्युटेंटचा एकही रुग्ण आढळला नसला, तरी आतापासूनच खबरदारी घेण्याचं आवश्यक असल्याचं सदस्यांनी सांगितले आहे.

कोरोना
मोठी बातमी: फडणवीसांचं 'जलयुक्त' स्वच्छच! ठाकरे सरकारकडून क्लीन चिट!

कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गौतम भन्साळी म्हणाले, की हा नवीन म्युटेंट असल्याचे दिसत नाही आणि मुंबईत एकही प्रकरण आढळलेले नाही, परंतु राज्य सरकारला आम्ही काही लोकांचे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्याचा सल्ला दिला आहे. नवी आहेत. सध्या मुंबई कोरोना नियंत्रणात असला तरी या म्युटेंटकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे.

सध्या भारतात नवीन म्युटेंटची कमी प्रकरणे आहेत. त्यामुळे त्याला घातक म्हणणे योग्य ठरणार नाही, परंतु तो डेल्टापेक्षा जास्त प्रभावी आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक असून, लोकानी मास्क घालणे, सामाजिक अंतर राखावे. -डॉ. राहुल पंडित, सदस्य, कोविड टास्क फोर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.