Maharashtra Corona Update: महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढतोय; 'या' जिल्ह्यात मास्कसक्तीचे आदेश!

राज्यातील कोरोनाची परिस्थिती काय आहे जाणून घ्या
corona update mumbai
corona update mumbaiesakal
Updated on

सातारा : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असून नागरिकांना काळजीचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. यापार्श्वभूमीवर साताऱ्यात कोरोनाचे दोन बळी गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मास्कसक्तीचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार साताऱ्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा-कॉलेजमध्ये मास्क लावणं अनिवार्य केलं आहे. (Covid cases increasing in Maharashtra due to Mask is mandatory to Satara district)

corona update mumbai
Supreme Court: "टीकात्मक विचार म्हणजे व्यवस्थेला विरोध नव्हे"; सुप्रीम कोर्टानं सरकारला सुनावलं

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोविडच्या संसर्गात वाढ झाली आहे. सोमवारी कोविडची लागण झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं जिल्हाप्रशासनानं कठोर निर्णय घेतला होता. सर्व प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणांवर मास्क सक्तीचे निर्देश देण्यात आले होते.

corona update mumbai
Johnson & Johnson: 'जॉन्सन अँड जॉन्सन'नं दिली 73,000 कोटींची ऑफर! नव्या आरोपांमुळं खळबळ

जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणं तसेच सध्या सुरु असलेल्या यात्रा, लग्न समारंभ, बाजार, मेळावे अशा ठिकाणी मास्क वापरावेत तसेच सॅनिटायझरचा वापर करावा असं आवाहनं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केलं आहे.

हे ही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

दरम्यान, राज्यात सध्या कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३५०० हजारांच्यावर पोहोचली आहे. तर मुंबईतच दीड हजार रुग्ण झाले आहेत. याबाबत नुकतीच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी माहिती देताना सांगितलं की, "राज्यातील कोविड रिकव्हरी रेट हा ९८ टक्के आहे. राज्यातील रुग्णालयांमध्ये केवळ ५२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यांपैकी एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर किंवा ऑक्सिजनवर नाही. महाराष्ट्रात सध्या चैत्र महिन्यात अर्थात एप्रिल महिन्यात जत्रांचा सिझन असतो तसेच सुट्यांचा काळ असल्यानं यामुळं नक्कीच कोरोना वाढणार आहे. सध्याचा जो व्हेरियंट XBB1.16 हा सौम्य आहे. त्यामुळं घाबरुन जाण्याचं कारण नाही. पण तरीही खबरादारीचा उपाय म्हणून मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळा असं आवाहनही आरोग्य मंत्र्यांनी केलं आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.