मुंबई : मुंबई विमानतळावर कोरोना चाचणी (Covid Test At Airport) आणि विलगीकरण (Quarantine Protocols) प्रोटोकॉलद्वारे लोकांकडून पैसे (Money) उकळण्यासाठी फसवणूक केली जात आहे, असा आरोप यूकेमधील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने केला आहे. मनोज लाडवा असे आरोप करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून ते 30 डिसेंबर रोजी त्यांच्या पत्नीसह सासऱ्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, या ठिकाणी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना अंत्यविधीला उपस्थित राहता आले नाही. याबाबत एनडी टिव्हीने वृत्त दिले आहे. याबाबत लाडवा यांनी मुंबई विमानतळावरून फेसबुक लाईव्हद्वारे व्हिडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. (fraud is being run at Mumbai Airport )
लंडनमधील हिथ्रो विमानतळावरून (Heathrow Airport London) उड्डाणापूर्वी तीन तास आधी लाडवा यांनी कोरोना टेस्ट केली होती, त्यावेळी त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह (Covid Test Report) आला होता. परंतु, ज्यावेळी लाडवा यांची मुंबई एअरपोर्टवर (Mumbai International Airport) पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली, त्यावेळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर लाडवा यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा टेस्ट करण्याची विनंती केली. मात्र, त्यांना नकार देण्यात आला. दरम्यान, लाडवा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना सरकारी विलगीकरण कक्षात हलिविण्यात आले. यामुळे त्यांना सासऱ्यांच्या अंत्यविधीत सहभागी होता आले नाही.
या सर्व घटनेनंतर लाडवा यांनी मुंबई विमानतळावरून (Mumbai Airport) फेसबुक लाईव्हद्वारे घटनेचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी मुंबई विमानतळावर आल्यानंतर आपण जादूने कोरोना पॉझिटिव्ह (Covid Positive) आल्याचे सांगत, मागे असलेले नागरिकदेखील याच विमानाने आले आहेत त्यांचा देखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित विमान कंपनीने एवढ्या पॉझिटिव्ह प्रवाशांना विमानात चढू दिले? जे कालपर्यंत कोरोना निगेटिव्ह होते असा प्रश्न. दरम्यान, कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास आणि विलगीकरण कक्षात न गेल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी धमकी बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोप लाडवा यांनी केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.