Swearing In Ceremony: महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली.
शपथविधीनंतर बोलताना नवनियुक्त राज्यपाल सीपी राधाकृष्णन म्हणाले की, मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आहे, याचा मला अभिमान आहे. जर शिवाजी महाराज नसते तर आज माझे नाव कदाचित राधाकृष्णन नसते.
ते पुढे म्हणाले की, मला आपली संस्कृती व ऐतिहासिक वारसा, याचा गर्व आहे. मी शेतकरी, ओबीसी, एसटी, एससी या प्रवर्गाच्या विकासासाठी काम करेन. तसेच मी राज्य सरकारसोबत समन्वयाने काम करेन.. राज्याच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा शब्द राज्यपालांनी यावेळी दिला. बारा आमदारांच्या नियुक्तीवरुन बोलताना त्यांनी जे आवश्यक आहे, तेच होईल असं म्हटलं.
शपधविधी सोहळ्यासाठी राज्यपालांच्या पत्नी श्रीमती सुमथी आर., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मंत्रिमंडळ सदस्य, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांचे कुटुंबीय आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी राधाकृष्णन झारखंडचे राज्यपाल होते. आपल्या राज्यपाल पदाच्या कालावधीत त्यांनी तेलंगणा राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून देखील अतिरिक्त कार्यभार सांभाळला.
राधाकृष्णन हे चार दशकांपासून तामिळनाडूचे राजकारण तसेच सार्वजनिक जीवनातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व राहिले आहे. त्यांचा जन्म 4 मे 1957 रोजी तिरुपूर, तमिळनाडू येथे झाला आणि त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदवी प्राप्त केली. सन 1998 मध्ये ते पहिल्यांदा कोईम्बतूरमधून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1999 साली ते तेथूनच पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.