कोरोना रोखण्यासाठी वेब पोर्टलची निर्मिती

Web-Portal
Web-Portal
Updated on

पुणे - घरात विलगीकरण (होम कॉरंटाइन) करणारा प्रत्येक जण स्वतःच्या प्रकृतीची अद्ययावत माहिती स्वतःच आता थेट वेब पोर्टलवर भरू शकेल, अशी व्यवस्था आता प्रशासनाने केली आहे. तुम्ही भरलेली ही माहिती थेट आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत जाईल. त्यातून विलगीकरण कक्षातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीची माहिती प्रशासनाला मिळणार आहे.

दक्षिण कोरियामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून पोर्टल आणि ॲप विकसित केले. त्यातून विलगीकरण कक्षातील नागरिक, रुग्ण यांना आपल्या प्रकृतीची माहिती यावर भरण्याची सुविधा होती. त्या आधारावर जिल्हा प्रशासनाकडून idsp.mkcl.org हे स्वतंत्र वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्यामध्ये घरीच विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तीचे दररोजचे अपडेट, तसेच शहरातील खासगी डॉक्‍टर यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती क्षणाक्षणाला जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे. आता या पोर्टलच्या माध्यमातून शहरातील दैनंदिन आरोग्यावर प्रशासनाची नजर राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.