मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा बलात्काराची घटना घडली आहे. बदलापूर आणि अकोल्यापाठोपाठ मुंबईतही 13 वर्षांच्या मुलीला वासनेची शिकार बनवण्यात आले आहे. मुंबईतील वाकोला येथे 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर वाकोला पोलिसांनी 21 वर्षीय तरुणाविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला गोरेगाव येथून अटक केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.