Crime News : भाजप आमदाराला लुटण्याचा प्रयत्न; ऑटोतून आले होते आरोपी अन्...

Crime News
Crime Newssakal
Updated on

अकोला : भाजपचे विधान परिषद आमदार वसंत खंडेलवाल यांना लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. रात्री १० वाजताच्या सुमारास गोरक्षण मार्गावरील खंडेलवाल भवनसमोर ही घटना घडली आहे. येथे एका ऑटोतून आलेल्या लोकांनी लुटण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आमदार खंडलेवाला यांनी खदान पोलिस स्टेशनला दिली आहे.

Crime News
मनपा निवडणुकीच्या प्रतीक्षेने वाढतेय अस्वस्थता! नेते अन् कार्यकर्त्यांमध्ये होतोय दुरावा

आमदाराला लुटण्याचा प्रयत्न करणारा ऑटोचालक आणि ऑटो ताब्यात घेण्यात आली आहे. आमदार वसंत खंडेलवाल पश्चिम विदर्भातील मोठे सराफा व्यावसायिक असून, विधान परिषदेच्या अकोला-वाशीम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आले आहेत. ते गांधी रोडवरील त्यांच्या सराफा दुकानातून घरी जात असताना हा प्रकार घडला आहे.

एका रिक्षाचालकासोबत त्यांचा शाब्दिक वाद झाला. खंडेलवाल भवनजवळ रस्त्याच्या मधोमध एक रिक्षा उभी होती. ही रिक्षा बाजूला घ्या, असा आग्रह आमदारांनी रिक्षा चालकाकडे धरला. मात्र, रिक्षाचालक ऐकायला तयार नव्हता. आमदार गाडीच्या खाली उतरले अन् त्याला समजवण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. त्यानंतर आमदारांनी रिक्षाचे फोटो काढायला सुरुवात केली.

Crime News
Raj Thackrey: मनसे विरुद्ध भाजप संघर्षाला सुरुवात, ठाकरे-शेलारांमध्ये जुंपली! मोठ्या नेत्यांवर...

त्यावेळी चक्क रिक्षावाल्याने त्यांच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला. हा प्रकार रविवारी रात्री १० वाजतानंतर घडला. हा वाद स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास पडला. लागलीच स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी केली आणि रिक्षाचालकाला समजावलं. आपण वाद घालत असलेला समोरील व्यक्ती आमदार असल्याचे त्यांनी रिक्षाचालकाला म्हटलं. त्यानंतर रिक्षाचालकाने मोबाईल रस्त्यावर ठेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.