Crime News: आईनेच केला पोटच्या मुलाचा खून; धक्कादायक कारण आलं समोर

रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबड उडाली होती
Crime News
Crime NewsEsakal
Updated on

गेल्या दोन दिवसाआधी बार्शीटाकळी ते अकोला मार्गावरील आळंदा फाट्यानजीक बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले असून सदर तरुणाची जन्मदात्या आईनेच हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या गुन्ह्यात मृतकाच्या आईला मदत करणारा आरोपी अद्यापही फरार आहे.

शुक्रवारी (८ सप्टेंबर) रोजी अंदाजे २२-२४ वर्षे वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतहेद बांधलेल्या अवस्थेत आळंदा फाट्यासमोर आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे व त्यांच्या पथकाने त्वरीत घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता, त्याचे नाव शांताराम रमेश नागे असून तो आळंदा येथील शिवसेना झोपडपट्टीत गत दहा ते बारा वर्षांपासून राहत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी अधिक तपास केला असता मयत शांताराम हा अविवाहीत व व्यासनाधीन होता व घरी नेहमी त्याच्या आईला शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा, अशी माहिती समोर आली.

Crime News
'आभासी प्रेम' ठरतंय आत्महत्येचं कारण; खेड्यातली मुलं अडकली जाळ्यात, नैराश्‍यातून उचललं जातंय टोकाचं पाऊल

शांतारामच्या वागण्याने त्याची आई त्रस्त झाली होती. ७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री शांताराम झोपेत असताना जन्मदात्या आईनेच त्याच्या डोक्यावर दगडी पाटा मारला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. नंतर दिवस उजाडायच्या अगोदरच आईने एका परिचिताच्या मदतीने शांतारामचे प्रेत घरातील गोधडीत बांधले व मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरिता रात्रीच दुचाकीने बार्शीटाकळी-अकोला मार्गाने निघाले. परंतु, दुचाकीतील पेट्रोल संपल्याने सोबतचा परिचित व्यक्ती मृतदेह तिथेच रस्त्याच्या कडेला ठेवून पेट्रोल आणण्याच्या बहाण्याने तेथून फरार झाला. त्याची वाट पाहून शांतारामची आईसुद्धा प्रेत तेथेच ठेवून घरी परतली.

Crime News
Truck Car Accident : तोरस्कर कुटुंबावर काळाचा घाला! अंत्यविधीसाठी जाताना ट्रक-कारच्या धडकेत माय-लेकराचा दुर्दैवी अंत

सकाळी रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबड उडाली होती. मात्र, बार्शीटाकळी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात गुन्ह्याचा छडा लावला. पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे, प्रवीण जाधव करीत आहेत.

आळंदा येथील हत्या प्रकरणात एकूण दोन आरोपी असून, एका आरोपीस अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी अद्यापही फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपीला १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

- शिरीष खंडारे, पोलिस निरीक्षक, बार्शीटाकळी

Crime News
Crime News: लोकं तिच्याकडं बघून पुढे गेली, त्यांना वाटलं वेडीच आहे ती पण तिच्यावर....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.