घरबसल्या करता येईल पिकांची ऑनलाईन नोंदणी! 'अशी' आहे पध्दत

घरबसल्या करता येईल पिकांची ऑनलाईन नोंदणी! 'अशी' आहे पध्दत
Updated on
Summary

आता शेतकऱ्यांना घरबसल्या त्यांच्या मोबाईलवरून पिकांची ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी ई-पिक नोंदणी हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार आहे.

सोलापूर: शेतात जाऊन पिकांची नोंदणी करताना तलाठ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर अनेकदा तलाठी मागच्या वर्षीचेच पिक अंदाजे नोंद करतो. परंतु, आता शेतकऱ्यांना घरबसल्या त्यांच्या मोबाईलवरून पिकांची ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी ई-पिक नोंदणी हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार आहे.

घरबसल्या करता येईल पिकांची ऑनलाईन नोंदणी! 'अशी' आहे पध्दत
सोलापूर जिल्ह्यात आठ महिन्यांत कोरोनाचे तीन हजार बळी

खरीप हंगाम संपल्यानंतर आता रब्बीची तयारी सुरु झाली आहे. शेतकऱ्यांना बॅंकांकडून पीककर्ज घेण्यासाठी सात-बारा उताऱ्यावरील पिकांची नोंद महत्त्वाची ठरते. परंतु, तलाठ्यांनी अंदाजे केलेल्या नोंदीचा शेतकऱ्यांना अनेकदा फटका बसतो. यावर आता शासनाने पर्याय शोधला असून शेतकऱ्यांना घरबसल्या पिकांची नोंदणी स्वत:हून करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

घरबसल्या करता येईल पिकांची ऑनलाईन नोंदणी! 'अशी' आहे पध्दत
सोलापूर विद्यापीठाच्या 'PET'चा बुधवारी निकाल ! 5 सप्टेंबरला मेरिट यादी

कृषी व महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली एक स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. त्यावर शेतकऱ्यांना त्यांनी पेरलेल्या पिकांची क्षेत्रनिहाय माहिती भरून पिकाचा फोटो अपलोड करून पिकांची नोंदणी करता येणार आहे. त्यामध्ये गट क्रमांक, जमीन जिरायत आहे की बागायत, सध्या किती क्षेत्रावर कोणत्या पिकाची लागवड केली आहे, यासह संपूर्ण माहिती नोंदविता येणार आहे. ही संपूर्ण माहिती तलाठ्याकडे ऑनलाइन पोहचणार असल्याने पिक नोंदणीसाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. पिक नोंदणी आता सुरु झाली आहे. 

घरबसल्या करता येईल पिकांची ऑनलाईन नोंदणी! 'अशी' आहे पध्दत
दक्षिण सोलापूर म्हणजे भाविकांसह पर्यटकांसाठी मोठी पर्वणी !

पीक नोंदणीची पध्दत

- अ‍ॅन्ड्राईड मोबाईलमधील प्ले स्टोअरमधून ई-पिक पाहणी अ‍ॅप डाऊनलोड करा

- अ‍ॅप ओपन झाल्यानंतर खातेदार निवडा (जिल्हा, तालुका, गाव) त्यानंतर मोबाईलवर आलेला चार अंकी सांकेतांक क्रमांक टाका

- परिचय पर्याय निवडल्यानंतर पिकांची माहिती नोंदवा, कायम पड नोंदवा, बांधावरील झाडे नोंदवा, अपलोड, पीक माहिती मिळवा असे विडोंज येतील

- पिकांची माहिती नोंदवा यावर क्‍लिक करा आणि त्यात गट नंबर, जमिनीचे क्षेत्र, पोट खराब, हंगाम, पीक पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र, पिकाचे नाव, क्षेत्र, जलसिंचन साधन, लागवडीचा दिनांक टाका

- संपूर्ण माहिती भरल्यानंतर शेवटी पिकाचा फोटो काढून तो अपलोड (सबमिट) करावा

- फोटो अपलोड करताना मोबाईल लोकेशन सुरु ठेवावे

- संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर 'सबमिट'वर क्‍लिक करा; त्यानंतर दुसऱ्या पिकांची नोंदणीही तशीच करा

- शेवटी मूळ विंडोजवर येऊन 'अपलोड' या विंडोजवर क्‍लिक करा

- अपलोड ओपन झाल्यानंतर शेवटी परिचय माहिती आणि पिक आहे या दोन्हीवर अनुक्रमे क्‍लिक करून अपलोड म्हणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.